Mahesh Motor Driving School has once again been awarded ‘A’ grade quality rating

महेश मोटार ड्रायव्हिंग स्कूल ला पुन्हा एकदा ‘अ’ दर्जा गुणवत्ता मानांकन 

पुणे : राज्याच्या परिवहन विभागाच्या आदेशानुसार नुकतेच राज्यातील मोटर ड्रायव्हिंग स्कूलची तपासणी करून त्यांचे मूल्यांकन करण्यात आले. या मध्ये पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालया ( आरटीओ) तर्फे नुकत्याच झालेल्या मोटार ड्रायव्हिंग स्कूल च्या तपासणी मध्ये महेश मोटार ड्रायव्हिंग स्कूल ला पुन्हा एकदा ‘अ’ दर्जा गुणवत्ता मानांकन मिळाले आहे. “अ”दर्जा प्राप्त मोटार ड्राईविंग स्कूल संचालकांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंद यांचे मार्गदर्शनाखाली कार्यालयात प्रशस्तीपत्रक व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी महेश मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक शशांक शिळीमकर व महेश शिळीमकर यांना प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर ,सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी  राजेंद्र पाटील, युवराज पाटील, अनंत भोसले, सुजित डोंगरजाळ व सहायक मोटार वाहन निरीक्षक सुचित्रा पाटील आदि उपस्थित होते. 

या विषयी बोलताना महेश मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक महेश शिळीमकर म्हणाले, प्रादेशिक परिवहन कार्यालय ,पुणे अंतर्गत नोंद असलेल्या मोटार ड्राईविंग स्कूलची गुणांकन तपासणी करण्यात आली या तपासणी मध्ये मोजक्याच मोटार ड्रायव्हिंग स्कूल ‘अ’ दर्जा मानांकन प्राप्त करू शकल्या. यापूर्वी झालेल्या गुणवत्ता तपासणी मध्ये ही महेश मोटर ड्रायव्हिंग स्कूलला ‘अ’ दर्जा मानांकन मिळाले होते.  मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या वतीने चालकांना दिले जाणारे प्रशिक्षण, स्कूल मधील उपलब्ध वाहने आणि इतर साधनांचा दर्जा, जागेची उपलब्धता, प्रशिक्षणातील आधुनिकता, प्रशिक्षक, विद्यार्थ्यांचा फीडबॅक, रस्ता सुरक्षा जनजागृती आदि बाबतची तपासणी केल्या नंतर परिवहन विभागाने सदरील ‘अ’ दर्जा मानांकन आम्हाला दिले आहे.

Leave A Reply

Translate »