रवींद्र धारिया यांना “मानवतेचे पालक” पुरस्कार प्रदान

0

पुणे – पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत ग्रामीण विकासासाठी केलेल्या प्रामाणिक आणि समर्पित सेवेसाठी वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांना प्रजापिता ब्रम्हकुमारीज संस्थेचा मानाचा “मानवतेचे पालक” पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. भारताचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राजस्थानमधील माउंट आबू येथे झालेल्या वैश्विक शिखर परिषदेमध्ये हा सन्मान सोहळा पार पडला.

यावेळी भारताच्या सांस्कृतिक राज्यमंत्री मिनाक्षी लेखी, खा. विजय दर्डा, हरियाणाचे सामाजिक न्याय राज्यमंत्री प्रकाश यादव, राजयोगिणी दादी रतनमोहिणी, राजयोगिणी बीके मृत्युंजया, राजयोगिणी ब्रम्हकुमारी सरितादीदी, जेष्ठ संपादक एल.पी. पंत, रुचिरा श्रीवास्तवा, वनराईचे विश्वस्त रोहिदास मोरे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Translate »