स्व. शांतीदेवी गुप्ता यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त 9 सप्टेंबर 2022 रोजी भजन संध्या कार्यक्रमाचे पुण्यातील कम्फर्ट झोन सोसायटी येथे आयोजन पुणे -स्व. शांतीदेवी जमनादास गुप्ता (गर्ग) यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त 9 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी 6 ते 8 या वेळेत भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम पुण्यातील बालेवाडी बाणेर येथील कम्फर्ट झोन सोसायटी येथील क्लब हाऊस येथे येथे होणार असून कार्यक्रमासाठी गायक स्वामी हिमांशू, तबलावादक सतीश काळे व सहकलाकार भजन सादर करणार आहेत. या भजन संध्या कार्यक्रमात गायक कलाकार आपली विविध भजने सादर करणार आहेत.शांती देवी गुप्ता एक अध्यात्मिक व सेवाभावी व्यक्तिमत्व होत्या . एमजे असोसिएटचे संचालक मनीराम गुप्ता हे शांतीदेवी जमनादास गुप्ता यांचे सुपुत्र असून ते सध्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. शांतीदेवी गुप्ता यांच्या पहिल्या स्मृतीनिमित्त भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . हा कार्यक्रम श्रावी मीडिया अँड फिल्म प्रॉडक्शनच्या फेसबुक पेज द्वारे लाईव्ह करण्यात येणार असून तो सर्वांसाठी मोफत असणार आहे. अशी माहिती त्यांचे सुपुत्र व एमजे असोसिएटचे संचालक मनीराम गुप्ता यांनी दिली.

Leave A Reply

Translate »