पुणे, पिंपरी – चिंचवड मधील कलाकारांसाठी दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण 

  • गरजू कलाकारांना मिळणार मोफत रुग्णवाहिकेची सुविधा

पुणे : एखाद्या निर्मात्याने रंगभूमी आणि चित्रपट कलाकार, तंत्रज्ञांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे हा निश्चितच चांगला उपक्रम आहे. महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना आहे. कोरोनाच्या काळात कलाकार, तंत्रज्ञ यांना वेळेवर रुग्णवाहिका व औषधोपचार उपलब्ध होत नव्हते. मात्र आता कधीही रात्री अपरात्री कलाकार, तंत्रज्ञ यांना रुग्णवाहिकेची  गरज पडली तर या रुग्णवाहिका मोफत उपलब्ध होणार आहेत. रंगभूमी आणि चित्रपट कलाकार, तंत्रज्ञ यांना संतोष चव्हाण यांनी उपलब्ध करून दिलेली ही सोय निश्चितच फायदेशीर ठरेल, असे मत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष  मेघराज राजेभोसले यांनी व्यक्त केले.

स्वर सर्वेश प्रोडक्शन आणि सर्वज्ञ नाट्य संस्था  यांच्या वतीने नाट्य, चित्रपट निर्माते संतोष चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी संतोष चव्हाण, श्रावणी चव्हाण, विनोद खेडकर, अर्जुन जाधव आणि कलाकार,तंत्रज्ञ आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Translate »