लेकीची महती सांगणारा ‘लेक माझ्या काळजाच्या’ अल्बम रसिकांच्या भेटीला

पुणे: ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’ या विषयी अनेक स्तरावर जनजागृती होत आहे. मुलींचं महत्व समाजात मोठ्या प्रमाणात असून सध्या ती पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालत आहे. प्रत्येक क्षेत्रात तिच्या कर्तुत्वाचा डंका वाजत आहे. लेकीची महती सांगणारा ‘लेक माझ्या काळजाच्या’ अल्बम रसिकांच्या भेटीला आला असून प्रसिद्ध संगीतकार हर्षित अभिराज यांनी संगीतबद्ध केला आहे.

लेक माझ्या काळजाच्या दावणीची खुट्टी ग !

थोडी हळवी लाजरी अन् थोडीशी ती हट्टी ग !

                 असे शब्दांचे बोल आहेत. या अल्बमची शब्दरचना पाठ्यपुस्तकातील कवी हनुमंत चांदगुडे यांची असून हर्षित अभिराज यांनी संगीताचा साज या अल्बमला चढवला आहे. याच बरोबर पार्श्वगायन देखील हर्षित अभिराज यांचे आहे. तर उदय गाडगीळ ( उमग म्यूझिक )यांची ही निर्मिती  आहे.

https://youtu.be/1ZSDBIUfc2g हा अल्बम रसिकांना ऐकता व पाहता येणार आहे. प्रत्येक लेकीसाठी व प्रत्येकाच्या लेकीसाठी हा अल्बम एकदा जरूर ऐका आणि पहा असे आवाहन हर्षित अभिराज , हनुमंत चांदगुडे,उदय गाडगीळ यांनी या पत्रकार परिषेदेत केले.

Leave A Reply

Translate »