8 व्या ‘महाटेक 2022’ या भव्य व्यावसायिक प्रदर्शनला उस्फूर्त प्रतिसाद

पुणे: 18 व्या ‘महाटेक 2022’ या भव्य व्यावसायिक प्रदर्शनला उस्फूर्त प्रतिसाद मिळात आहे असे प्रतिपादन विनय मराठे आणि वेदांत गोयल यांनी केले. कृषी महाविद्यालय पटांगण (नवीन),  सिंचननगर, शिवाजीनगर, पुणे येथे सुरु असलेल्या 18 व्या ‘महाटेक 2022’ या भव्य व्यावसायिक प्रदर्शनला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून नागरिकांसोबत व्यसायिकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे अशी माहिती नियो मेगा स्टीलचे डायरेक्टर  वेदांत गोयल आणि मराठे इन्फोटेक प्रा. लि चे संचालक श्री. विनय मराठे  यांनी दिली. नियो मेगा स्टीलचे युवा संचालक या प्रदर्शनला प्लॅटिनम स्पोन्सर्स रुपात पुढे आले आहे,हा एक युवा वर्गासाठी आदर्श ठरला आहे असेही मराठे म्हणाले. नियो मेगा स्टीलने महाटेक व्यावसायिक प्रदर्शनात प्रथमच भाग घेतला आहे आणि आमच्या स्टॉलला विविध क्षेत्रातून चांगला प्रतिसाद मिळत आहे,असे उद्गार  वेदांत गोयल यांनी काढले. पुढे वेदांत गोयल म्हणाले की, आमच्या स्टॉलला पुण्यासह सातारा, सांगली, मुंबई, कोल्हापुर, सोलापुर, ठाणे, अहमदनगर आणि शहरातून आलेल्या व्यापार्‍यांनी सकारात्मक भेट दिली.  नियो मेगा स्टील बांधकाम क्षेत्रात इन्फ्रास्ट्रक्चर व कारखाने निर्माणसाठी लागणारे सर्वप्रकारचे स्टील, एमएस पाइप्स, प्लेट्स, स्ट्रक्चरल स्टील आदि मध्ये व्यवसाय करतात. पुणे, बारामती, नासिक, औरंगाबाद, मुंबई येथे व्यवसाय विस्तारलेला आहे.उद्या रविवार प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे, तरी अधिकाअधिक व्यवसायिकांनी भेट द्यावी, असे आवाहन  वेदांत गोयल यांनी केले.

Leave A Reply

Translate »