जी एल . ग्रुपच्या एअरवेव फॅन्सच्या प्रॉडक्ट लाँच कार्यक्रमाचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुण्यातील रॅडिसन हॉटेल आयोजन संपन्न

0

पुणे-जी एल . ग्रुपच्या एअर वेव फॅन्सच्या प्रॉडक्ट लाँच कार्यक्रमाचे आयोजन पुण्यातील खराडी येथील रॅडिसन हॉटेल येथे नुकतेच करण्यात आले. या एअरवेव फॅन्सच्या जाहिरातीमध्ये प्रसिद्ध मॉडेल, अभिनेते व निर्माते विशाल गोरे व प्रसिद्ध मॉडेल अभिनेत्री झेबा शेख यांनी काम केले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. या प्रॉडक्ट लॉंच कार्यक्रम प्रसंगी शालीनी फाउंडेशनचे अध्यक्ष, निर्माते प्रसिद्ध मॉडेल व सामाजिक कार्यकर्ते विशाल गोरे ,फॅशन मॉडेल झेबा शेख, जी एल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आयुष राज, मॉडेल व अभिनेत्री डॉ. प्रचिती मुंडे, मॉडेल सारा मोतीवाला, अनिल नांगिया, अनिल झा आदी मान्यवर उपस्थित होते. विशाल गोरे यांनी यापूर्वी बोल ना तू या म्युझिक अल्बमची निर्मिती केली आहे तसेच इतर विविध म्युझिक अल्बम मधून अभिनय केला आहे. विशाल गोरे यांनी शालिनी फाऊंडेशनची स्थापना केली असून त्या मार्फत विविध सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले आहेत . वीज बिलाची बचत व पैशाची बचत एअरवेव फॅन करतो. माफक व योग्य दरात आता ग्राहकांना हा फॅन आता सर्वत्र उपलब्ध झाला आहे. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सिमरन पाटेकर यांनी केले

Leave A Reply

Your email address will not be published.

Translate »