कपिल देव उलगडणार जिवण प्रवास

पुणे – महिला उद्याजीकांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वताच्या जिवनातील जडणघडण अनुभव तसेच महत्वाचे किस्से व्यक्त करीत फिक्की (FICCI) , महिला विंग , आयोजित कार्यक्रमात स्वत : चा जिवनप्रवास क्रिकेट पटटु कपिल देव उलगडणार आहे . फिक्की महिला विंग ( FLO ) आयोजित महिलांना उद्योग व्यवसायात प्रोत्साहन देण्यासाठी उदया एका परिषदेचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे .

त्या कार्यक्रमास कपिल पमुख मार्गदर्शक म्हणुन उपस्थित राहणार आहेत . फिक्की (FICCI) पुणे हि उदयोजकांची शिखर संस्था आहे . या संस्थेची ( FLO ) महिला विंग ही एक आघाडी आहे . नुकतेच ७ एप्रिल रोजी महिला विंग ( FLO ) पुणेच्या अध्यक्षपदी प्रसिध्द उद्योजीका निलम सेवलेकर यांची निवड करण्यात आली आहे . त्या निमित्त सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . निलम सेवलेकर हया उद्योजक व्यवसाया बरोबरच त्यांचे सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनिय कार्य आहे .

त्या पुण्याचे लोकप्रिय महापौर बाबूराव सणस यांची नात असून बाळासाहेब सणस यांच्या कन्या आहेत . सेवलेकर यांनी वर्षभरात पुण्यातील फिक्कीच्या महिला उद्योजकांची संख्या मोठया प्रमाणात वाढविण्याचा संकल्प केला आहे . महिला उद्योजीका
घडवण्यासाठी वर्षभर विविध उपक्रम उद्योग मार्गदर्शन शिबीर , परिषद , व मार्गदर्शन पर कार्यक्रम आयोजित करून महिला उद्योजकांना मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य आणी संधी निर्माण करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले .

त्याचाच एक भाग उदया दिनांक 16 एप्रिल आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटटु कपिल देव यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . या पत्रकार परिषदेस महिला विंग अध्यक्षा ( FLO ) निलम सेवलेकर , वरिष्ठ उपाध्यक्ष रेखा मगर , उपाध्यक्षा पिंकी राजपाल , खजिनदार सोनिया राव , सहखजिनदार पुनम खोच्चर , सचिव अनिता अग्रवाल , सहसचिव सुजाता सबनिस , उषा पुनावाला यांच्या सह पुणे शहरातील फिक्की ( FLO ) च्या प्रमुख पदाधिकारी व उद्योजिका उपस्थित होत्या .

Leave A Reply

Translate »