Pravin Tarde’s Sarsenapati Hambirrao release on May 27

Pune (P&V news service):- Sarsenapati Hambirrao is a Marathi historical drama directed by Pravin Tarde. It will hit the box office on May 27. The film revolves around the life of Maratha Warrior Sarsenapati Hambirrao Mohite and features Gashmeer Mahajani, Raqesh Bapat, Shruti Marathe, and Pravin Tarde in the lead roles.


Based on the Maratha warrior Hansaji Mohite who was later given the title of Sarnobat Hambirrao, the film portrays his life as the Commander in Chief of Chatrapati Shivaji Maharaj`s army.


Hambirrao Mohite served as the chief military commander in the army of Chhatrapati Shivaji Maharaj and completed numerous campaigns for him. He also served under the reign of Chhatrapati Sambhaji Maharaj.


The poster shared by Pravin Tarde features him in a ferocious and muscular avatar with a sword. Tarde has also penned the story, dialogues, and screenplay for the film, produced by Sandeep Mohite Patil, Saujanya Nikam, and Dharmendra Bora.

बहुचर्चित ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर ठरली

– येत्या 27 मे 2022 रोजी होणार सर्वत्र प्रदर्शित;;

सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे यांच्या आगामी बहुचर्चित ‘सरसेनापती हंबीरराव’ हा भव्यदिव्य ऐतिहासिक चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची उत्कंठा प्रेक्षकांना लागून राहिली होती. जगभरातील शिवप्रेमी या ऐतिहासिक मराठी चित्रपटाची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत. अखेर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे, 27 मे 2022 रोजी ‘सरसेनापती हंबीरराव’ हा बिगबजेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून मे महिन्याच्या सुट्टीत दमदार संवाद, जबरदस्त ऍक्शनची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा रक्त उसळवणारा टीझर प्रदर्शित झाला होता. त्याला जगभरातील प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यातील संवाद आणि जबरदस्त ऍक्शन सिक्वेन्समुळे हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबाबत उत्कंठा वाढली होती. या चित्रपटात मराठीतील ‘हँडसम हंक’ अभिनेता गश्मीर महाजनी हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन छत्रपतींच्या काळात स्वराज्याचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळालेले एकमेव सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची व्यक्तिरेखा स्वतः प्रविण तरडे साकारत आहेत. याशिवाय अनेक दिग्गज कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

संदीप मोहितेपाटील प्रस्तुत, उर्वीता प्रॉडक्शन्स निर्मित आणि शेखर मोहितेपाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा यांची निर्मिती असलेला ‘सरसेनापती हंबीरराव’ हा भव्य, ऐतिहासिक मराठी चित्रपट येत्या 27 मे 2022 रोजी संपूर्ण महाराष्ट्रासह जगभरातील शिवप्रेमींच्या भेटीला मोठ्या पडद्यावर येत आहे.

Leave A Reply

Translate »