अभिनेता स्वप्नील जोशीची स्टारग्लेज फिल्म अँड टेलिव्हिजन अकॅडमीला गेस्ट लेक्चरर म्हणून भेट

ONE’ या OTT प्लॅटफॉर्मवर स्टारग्लेज फिल्म अँड टेलिव्हिजन अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळणार संधी

पुणे : स्टारग्लेज फिल्म अँड टेलिव्हिजन अकॅडमीच्या वतीने आयोजित ‘कलारंभ 2’ या अभिनय प्रशिक्षण उपक्रमात आज अभिनेता स्वप्नील जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी या नवोदित कलाकारांसमवेत संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली व विविध अंगांनी अभिनय कलेचे महत्व अधोरेखीत केले. यावेळी स्वप्नील जोशी यांनी स्टारग्लेज फिल्म अँड टेलिव्हिजन अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना आपल्या ‘ONE’ या OTT प्लॅटफॉर्मवरील आगामी प्रोजेक्टमध्ये संधी देणार असल्याचे सांगितले. 

स्टारग्लेज फिल्म अँड टेलिव्हिजन अकॅडमीच्या वतीने आयोजित ‘कलारंभ 2’ या अभिनय प्रशिक्षण उपक्रमात स्वप्नील जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत स्वप्नील जोशी बोलत होते. यावेळी स्टारग्लेज फिल्म अँड टेलिव्हिजन अकॅडमीच्या संचालिका पूजा जालंदर आणि संचालक अभिषेक भारद्वाज, अमित गैधर,अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, चित्रपट लेखक राज काजी, चित्रपट दिग्दर्शक विशाल कुदळे, एपीआय प्रेमा पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी स्वप्नील जोशी म्हणाले, आज स्टारग्लेज फिल्म अँड टेलिव्हिजन अकॅडमी आयोजित  ‘कलारंभ 2’ मधील विद्यार्थ्यांना आज अभिनय विषयक मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. त्यांचे अभिनय विषयक दृष्टीकोन व संकल्पना जाणून घेता आल्या. या नवोदीत कलाकारांमध्ये खूप क्षमता आहे. या कलाकारांना मी माझ्या ‘ONE’ या OTT प्लॅटफॉर्मवरील आगामी प्रोजेक्टमध्ये संधी देण्याचे ठरविले आहे. हे विद्यार्थी नक्कीच या संधीचे सोने करतील.  

कार्यशाळेबद्दल माहिती देताना स्टारग्लेज फिल्म अँड टेलिव्हिजन अकॅडमीच्या संचालिका पूजा जालंदर म्हणाल्या, ‘कलारंभ 2’ अभिनय प्रशिक्षण उपक्रमात आज अभिनेते स्वप्नील जोशी यांनी जवळपास 50 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी विद्यार्थ्यांमधील  अभिनय गुण पारखले. आगामी काळात स्वप्नील जोशी नक्कीच या उदयोन्मुख कलाकारांना संधी देतील यात शंका नाही.

Leave A Reply

Translate »