विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांकडून शालेय विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे

बारामती : विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती अभियान राबविण्यात आले.

 

या अभियानादरम्यान विद्यार्थ्यांना अज्ञात कॉल, बनावट संकेतस्थळे, ऑनलाइन गेमिंगमधील फसवणूक, ओटीपी व आर्थिक फसवणूक, फिशिंग तसेच सुरक्षित इंटरनेट वापराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच डिजिटल साक्षरतेचे महत्त्व आणि शासकीय ऑनलाइन सेवांचा सुरक्षित व जबाबदारीने वापर करण्याबाबतही माहिती देण्यात आली.

 

या जनजागृती उपक्रमात सई चव्हाण व सिद्धी बाबर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून सायबर सुरक्षेच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन केले. सुरक्षित डिजिटल व्यवहार, वैयक्तिक माहितीचे संरक्षण, सोशल मीडिया सुरक्षितता आणि ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याबाबत विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.

 

विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सक्रिय सहभाग नोंदविला. सायबर गुन्ह्या

 

Comments are closed.

Translate »