आता ‘रूट्स टू विंग्स’ प्रत्येक मुलाचे ऐकणार असल्यामुळे पालकांची चिंता मिटली

पुणे : इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, फातिमा नगर, पुणे यांनी “रूट्स टू विंग्स” हा बालविकास विभाग सुरू केला आहे. त्यामध्ये विकास आणि शिक्षण विषयक अडचणी असलेल्या मुलांसाठी, एकाच छताखाली सर्व मदत उपलब्ध होणारा आहे. इथे बालरोग-न्यूरोलॉजी, बालरोगशास्त्र आणि संरचित मूल्यांकन, तात्काळ हस्तक्षेप आणि दीर्घकालीन पाठपुरावा यासाठी अनेक विभाग आणि उपचारपद्धिना एकत्र आणत असल्याने, कुटुंबांना आता एका क्लिनिकमधून दुसर्या क्लिनिकमध्ये जाण्याची आवश्यकता उरली नाही.

हे केंद्र, न्यूरोडायव्हर्जंट विकास किंवा शिक्षण विषयक समस्या असलेल्या मुलांबरोबरच इतर सर्व मुलांसाठी आहे, आणि सुरुवातीच्या काळातच, पुढील संभाव्य विलंब ओळखून, त्यांना वैद्यकीय किंवा उपचारात्मक मूल्यांकनासाठी विविध विभागांकडे पाठविण्याची चिकित्सा मूल्यांकन सेवा प्रदान करते. नियमित विकास विषयक तपासणीमुळे मूल योग्य मार्गावर आहे की नाही किंवा अतिरिक्त मदतीची आवश्यकता आहे, हे ओळखण्यास मदत होते. मुलांच्या कलाकृती आणि ॲक्टिव्हिटी शिटस् सलगतेने प्रदर्शित केल्या जातात. ज्याद्वारे हात आणि बोटातील लहान स्नायूंची कौशल्ये, समन्वय आणि आत्मविश्वासातील प्रगतीचा दृश्यमान रेकॉर्ड तयार होतो, ज्यामुळे चिकित्सक आणि पालकांना मुलाच्या प्रगतीच्या प्रवासाचे अनुसरण करण्याचा एक सोपा मार्ग मिळतो. हे केंद्र पहिल्यांदाच पालक झालेल्यांना, सामान्य विकास आणि वयानुसार योग्य टप्पे स्पष्टपणे आणि आत्मविश्वासाने समजण्यास मदत करून, त्यांच्या पालकत्वाच्या प्रवासात मदत करते.

बाल विकास विभागातील, “रूट्स टू विंग्स”, हे कन्सल्टंट ऑक्युपेशनल थेरपिस्ट – डॉ. झैनब मिठाईवाला यांच्या नेतृत्वाखाली आहे. मुख्य वैद्यकीय पथकात, बालरोग-न्यूरोलॉजिस्ट डॉ. अभिजित बोत्रे, कन्सल्टंट पेडियाट्रिशियन – डॉ. संदेश रनवाल, नवजातशिशूशास्त्रज्ञ आणि पेडियाट्रिशियन – डॉ. अश्विन बोराडे, आणि स्पीच थेरपिस्ट – मृण्मयी लोंढे यांचा समावेश आहे, ज्यांना फिजिओथेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, स्पीच अँड लँग्वेज थेरपिस्ट, मानसशास्त्रज्ञ आणि विशेष शिक्षक यांचे सहकार्य लाभलेले आहे.

केंद्र विकासात्मक आणि वर्तणुकीय मूल्यांकन; फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल, स्पीच अँड लँग्वेज थेरपी; मानसशास्त्रीय समुपदेशन आणि उपचारात्मक शिक्षण प्रदान करते. मूल्यांकनानंतर वैयक्तिक उपचाराची उद्दिष्टे निश्चित केली जातात आणि नियमित अंतराने पुनरावलोकन केले जाते. शाळा आणि परिसरातील समुदायांसाठी आयोजित पालक-प्रशिक्षण सत्रे, गट कार्यशाळा आणि जागरूकता-चर्चा यामुळे संभाव्य धोका वेळेवर ओळखण्यास आणि मुलांना विलंब न करता वैद्यकीय सल्ला देण्यास मदत होते. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, इनामदार हॉस्पिटल, बालवाडी शिक्षकांना, विकासात्मक आणि भावनिक समस्या लवकर ओळखण्यासाठी आणि वर्गातील न्यूरोडेव्हलपमेंटल गरजा असलेल्या मुलांना आधार देण्यासाठी प्रशिक्षण देते, गट उपचारांसोबत काही सत्रे आयोजित करून वर्ग आणि वैद्यकीय मदतीला एकत्र जोडते.

रूट्स टू विंग्सच्या मागील दृष्टिकोनाबद्दल बोलताना, डॉ. झैनब मिठाईवाला म्हणाल्या, “पालक अनेकदा आम्हाला सांगतात की त्यांना काहीतरी ‘बरोबर नाही’ असे वाटते परंतु कुठे जायचे किंवा कोणाला विचारायचे हे त्यांना माहित नव्हते. अचूक मार्गदर्शन, वेळेवर हस्तक्षेप आणि अशी जागा, जिथे त्यांना ऐकले जाईल, पाठिंबा दिला जाईल आणि त्यांच्यावर कोणताही शिक्का मारला जाणार नाही, ती कुटुंबाना मिळावी असे आम्हाला हवे आहे.”

रूट्स टू विंग्सच्या टीमचा असा विश्वास आहे की विकासात्मक आरोग्य हे शारीरिक आरोग्याइतकेच महत्त्वाचे आहे. न्यूरोडेव्हलपमेंटल समस्या – जसे की संवादात विलंब, शिक्षणात अडचणी किंवा लक्ष देण्याशी संबंधित चिंता – हे केवळ “खोटारडेपणा” किंवा “आळस” नसतो आणि जेव्हा या समस्या लवकर ओळखल्या जातात आणि समजून घेऊन व्यवस्थापित केल्या जातात तेव्हा अनेक मुले चांगली कामगिरी करतात. त्यांच्या मुलाच्या प्रगतीच्या कोणत्याही पैलूबद्दल काही खटकत असेल तर प्रत्येक पालकांना बाल विकास केंद्राला किमान एक भेट देण्याचा विचार करण्यास ते प्रोत्साहित करतात. जरी सर्वकाही सामान्य वाटत असले किंवा कोणतीही सूक्ष्म चिन्हे दिसली तरी, आश्वासकता आणि स्पष्टता आयुष्यभरासाठी एक देणगी ठरू शकते. रूट्स टू विंग्समागचे ध्येय म्हणजे निरोगी, आनंदी भावी-पिढीला आधार देणे आणि पालकांच्या बरोबरीने उभे राहणे, जेणेकरून कोणालाही मागे वळून पाहावे लागणार नाही आणि असा प्रश्न पडू नये की एक साधी लवकर दिलेली भेट त्यांच्या मुलाला सोपी, उज्ज्वल सुरुवात प्रदान करू शकली असती का?

Leave A Reply

Translate »