महाराष्ट्रात प्रथमच भक्तिमय उपक्रम‘खेळ रंगला वारकर्‍यांचा’ २८ रोजीसंपूर्ण महाराष्ट्रातून हजारों वारकर्‍यांचा सहभाग

पुणे ः संतांचा वसा, वारकर्‍यांचा वारसा आणि अभंगांचे अमृत हेच महाराष्ट्राचे वैशिष्टय आहे. या वारकरी परंपरेला आणि संस्कृतीला अभिवादन म्हणून महाराष्ट्रात प्रथमच मिलिंद दादा वाळंज युवा मंचाच्या वतिने ‘खेळ रंगला वारकर्‍यांचा’ हा अभिनव व भक्तिमय उपक्रम साजरा करण्यात येत आहे. हा आगळा-वेगळा उपक्रम रविवार, २८ सप्टेंबर २०२५ रोजी सुस येथील सनीज वर्ल्ड मध्ये सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत साजरा करण्यात येईल. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून हजारों वारकरी, कीर्तनकार व प्रवचनकार मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ता मिलिंद वाळंज, वारकरी सांप्रदाय समाज तालुका मुळशी दिंडी क्र. ९६चे हभप दशरथ महाराज वाहले, हभप पांडूरंग महाराज पारखी, प्रविण माताळे व अमित अखाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्राच्या भूमीत भक्ती, श्रध्दा, परंपरा आणि वारकरी संप्रदायाचे अमूल्य दर्शन घडविणारा हा उपक्रम मा. मिलिंद दादा वाळंज युवा मंचातर्फे सामाजिक कार्यकर्ता व युवा उद्योजक मिलिंद नंदकुमार (बाबूजी) वाळंज यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला आहे.
या उपक्रमाची वैशिष्टये म्हणजे वारकरी परंपरेतील पारंपरिक खेळ, विरंगुळा, आनंद मेळावा व भक्तिरसात न्हाऊन निघविणारे अभंग गायन होणार आहे. येथे वारकरी परंपरेचे विविध पैलंचेू खेळ, भक्तिगीत, गवळणी व सांस्कृतिक कार्यक्रम होतील. यामध्ये सहभागींतील पहिल्या १० भाग्यवान विजेत्या जोडप्यांना विमानाने काशी दर्शन घडविण्यात येईल. खेळाबरोबर अनेक बक्षिसे जिंकण्याची संधी आहे. या उपक्रमातून वारकरी जीवनशैली,भक्ती आणि संस्कार तसेच यातून आनंद यांचे दर्शन घडणार आहे.
या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहून वारकरी संप्रदायाचा उत्सव साजरा करण्याचे आवाहन आयोजक मिलिंद नंदकुमार वाळंज यांनी केले.

मिलिंद (दादा) वाळंज युवा मंच,
 मुळशी पुणे
संपर्कः ९८५०५५४९९९

Leave A Reply

Translate »