
पुणे : ग्रावर अँड वाइल (इंडिया) लिमिटेड या कंपनीतर्फे CSR activities चे आयोजन केले जाते. यामध्ये प्रामुख्याने श्री संत मुक्ताबाई माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावर लक्ष केंद्रित करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचे नियोजन 2025 या वर्षात कंपनीतर्फे करण्यात आले होते. निमित्त होते श्री संत मुक्ताबाई माध्यमिक शाळा सोळू, तालुका -खेड,जिल्हा -पुणे.या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचे. श्री संत मुक्ताबाई माध्यमिक शाळा सोळू ही शाळा आळंदी पासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असणारी सोळू गावातील ही जिल्हा परिषदेची शाळा,या शाळेत एकूण २00 च्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेतात, या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे काम ग्रावर अँड वाइल (इंडिया) लिमिटेड .या कंपनीने आज केले. सर्व विद्यार्थ्यांना दैनंदिन शालेय जीवनात आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक वस्तूंचे वाटप करण्यात आले, या प्रसंगी ग्रावर अँड वाइल (इंडिया) लिमिटेड या कंपनीचे श्री. रोहित मोर (डायरेक्टर ),
श्री. संजय ताम्हणकर( चीफ ऑपरेशन ऑफिसर ),
श्री. राजेंद्र कांबळे (वरिष्ठ सर व्यवस्थापक ) उपस्थित होते. कंपनी आणि शाळा यांच्यातील समन्वय साधण्याचे काम सोळू गावचे ग्रामपंचायत सदस्य श्री.विनोद ठाकूर यांनी केले. श्री.विनोद ठाकूर यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत कंपनीने शाळेतील विद्यार्थ्यांची मदत केली आहे. या प्रसंगी मा.सरपंच विठ्ठल ठाकूर, मा.सरपंच आणि शाळा व्यवस्थापन समितीचे विद्यमान संचालक बाबासाहेब ठाकूर,मा.सरपंच अतुल ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य गणेश गोडसे, कंपनी चे कर्मचारी व शाळेचे माजी विद्यार्थी श्री. ईश्वर गायकवाड, श्री . गजानन शेळके, श्री. विठ्ठल बाबर, निरंजन नायक व कोमल खलाटे, शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. या उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल शाळेच्या वतीने ग्रावर अँड वाइल (इंडिया) लिमिटेड.या कंपनीच्या उपस्थित सर्व अधिकारी वर्गाचा सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
चीफ ऑपरेशन ऑफिसर संजय ताम्हणकर सर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देताना भरपूर अभ्यास करून आपल्या आईवडिलांचे, गावाचे आणि शाळेचे नाव उज्वल करा, असा संदेश विद्यार्थ्यांना दिला.
वरिष्ठ सरव्यवस्थापक राजेंद्र कांबळे यांनी आपल्या मनोगतातून कंपनीतर्फे यापुढील काळातही आपल्या शाळेला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशा पद्धतीचे विचार व्यक्त केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोळू तील शिक्षक श्री. रविंद्र मोरे सर यांनी प्रास्ताविक केले तर श्री.शिवाजी नवले यांनी सूत्रसंचालन केले. मा.सरपंच श्री.विठ्ठल ठाकूर यांनी शाळेच्या व ग्रामस्थांच्या वतीने कंपनीचे व उपस्थित अधिकारी वर्गाचे आभार मानले व यापुढील काळात अशाच प्रकारच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.