पुण्यातील अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रनमध्ये यशस्वी उपचार

पुणे – पुण्याच्या मोशी परिसरातून एक काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. तीन वर्षांची चिमुरडी खेळता खेळता दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनीतून पडली. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आणि तिला ताबडतोब नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुदैवाने या चिमुरडीचा जीव वाचला असून पुण्यातील अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रन येथे पीआयसीयू आणि आपत्कालीन सेवांचे प्रमुख आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. मिलिंद जंबगी, बालरोग न्युरोलॉजिस्ट डॉ. शिजी चालीपट आणि न्यूरोसर्जन डॉ. अभिजीत घंगाळे यांच्या टिमने तिच्यावर यशस्वी उपचार केले.
पुण्यातील मोशी परिसरात राहणाऱ्या श्री नितीन सूर्यवंशी व सौ अंजली सूर्यवंशी यांची एकुलती एक मुलगी गायत्री सूर्यवंशी ही खेळता खेळता दुसऱ्या मजल्यावर असलेल्या घराच्या बाल्कनीतून खाली पडली. शेजाऱ्यांना ती बेशुद्ध अवस्थेत आढळली असून तिच्या कवटीला सूज आली होती. तिच्या पालकांनी तिला जवळच्या रुग्णालयात नेले जिथे तिची सखोल तपासणी करण्यात आली आणि तातडीने तिला पुण्यातील अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रन येथे हलविण्यात आले.
मेंदूला झालेल्या दुखापतीमुळे तिची प्रकृती गंभीर झाली होती बेशुध्दावस्थेतच तिला औंध, पुणे येथील अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रन येथे दाखल करण्यात आले. पुढील उपचाराकरिता तिला पीआयसीयु म्हणजेच बाल अति दक्षता विभागात दाखल करण्यात आले. अतिदक्षता तज्ञ ( इंटेन्सीव्हीस्ट)डॉ. मिलिंद जंबगी, बालरोग न्युरोलॉजिस्ट डॉ. शिजी चालीपट तसेच टिमच्या निरीक्षणाखाली चोवीस तासांकरिता तिला अति दक्षता विभागात ठेवण्यात आले. सीटी स्कॅन मध्ये कवटीच्या हाडाचे फ्रॅक्चर आढळले, परंतु सुदैवाने त्याचा मेंदूवर जास्त दाब आला नाही.
तिच्या मेंदूवर दबाव येऊन तिची प्रकृती खालावल्यामुळे तिच्या मेंदूवरील दबाव कमी करण्यासाठी व रक्ताची गाठ काढण्यासाठी तिच्यावर न्यूरोसर्जन डॉ. अभिजीत घंगाळे यांनी तातडीने आपत्कालीन शस्त्रक्रिया केली. सतत देखरेख आणि प्रसंगावधान राखत बालरोग तज्ज्ञांनी केलेल्या अचुक उपचार आणि शस्त्रक्रियेने तिला नवे आयुष्य मिळाले.
उंचावरून खाली पडल्याने, विशेषतः लहान मुलांना, मेंदूला दुखापत होऊ शकते जी गंभीर रुप धारण करु शकते. जेव्हा रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा ती कोमात होती. रुग्णाच्या प्रकृतीचे काळजीपूर्वक निरीक्षण करण्यात आले आणि जेव्हा तिची प्रकृती बिघडेल असे वाटले, तेव्हा तिला ताबडतोब शस्त्रक्रियेसाठी नेण्याचा निर्णय घेण्यात आला. आपत्कालीन पथक, न्यूरोलॉजिस्ट, इंटेन्सिव्हिस्ट आणि न्यूरोसर्जन यांच्या एकत्रित प्रयत्नांनी तिला वाचविता आले. आज, ती बरी होत असून पुन्हा सामन्य आयुष्य जगण्यासाठी तयार आहे. रुग्णाला आंतरराष्ट्रीय मानकांनुसार उच्च दर्जाचे उपचार मिळाल्यामुळे आज तिला नवे आयुष्य मिळाल्याची प्रतिक्रिया आपत्कालीन सेवेचे प्रमुख डॉ. मिलिंद जंबगी यांनी स्पष्ट केले.
न्यूरोसर्जन डॉ. अभिजीत घंगाळे सांगतात की, या मुलीची न्यूरोलॉजिकल स्थिती बिघडू लागली होती आणि ती मृत्यूशी झुंजत होती. तिच्या सीटी स्कॅन तपासणीनुसार तिला तातडीने उपचाराची आवश्यकता असल्याचे दिसून आले. रक्ताची गाठ काढून टाकण्यासाठी आणि तिच्या मेंदूवरील दाब कमी करण्यासाठी आम्ही आपत्कालीन शस्त्रक्रिया केली. मेंदूवर दाब येऊन हर्निएशन आणि अचानक मृत्यू होऊ शकणाऱ्या अंतर्गत दबावापासून मुक्त करण्यासाठी तिची कवटी उघडून सुमारे एक तासभर शस्त्रक्रिया करण्यात आली. सुदैवाने ही प्रक्रिया सुरळीत पार पडली आणि तिच्या मेंदूने चांगला प्रतिसाद दिला, ज्यामुळे तिला जीवनाची दुसरी संधी मिळाली. ही बालरुग्ण आता हळूहळू बरी होत आहे आणि तिला घरी सोडण्यात आले असून फॅालोअप सुरु आहे.
मुलांमध्ये मेंदूला झालेल्या दुखापतीच्या बाबतीत, प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो. उपचारात विलंब झाल्यास गंभीर न्यूरोलॉजिकल समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे रुग्णाची विचार करण्याच्या, हालचाल करण्याच्या किंवा जगण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. अंकुरा हॉस्पिटल मध्ये आम्ही जागतिक दर्जाचे उपचार पुरवतो. आमचे प्रगत न्यूरो-मॉनिटरिंग तंत्रज्ञान आणि विशेष बालरोग अतिदक्षता विभागामुळे आम्हाला मुलांच्या न्यूरोलॉजिकल स्थितीत होणारे किरकोळ बदल देखील बारकाईने शोधण्यास आणि त्यावर यशस्वी उपचार करण्यास मदत होते. मी पालकांना सांगू इच्छिते की तुमचे मूल पडल्यानंतर बेशुध्द पडणे, उलट्या होणे, रक्तस्त्राव होणे, फिट्स येणे किंवा असमान डोळ्यांच्या बाहुल्यांची हलचाल दिसल्यास हे धोक्याचे संकेत असू शकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, लहान मुलांना कधीही बाल्कनी किंवा मोकळ्या जागेत लक्ष न देता सोडणे टाळावे जेणेकरुन अशा अपघातांना रोखता येईल *अशी प्रतिक्रिया बालरोग न्युरोलॉजिस्ट डॉ. शिजी चालीपट यांनी व्यक्त केले.*
जेव्हा आम्ही तिला जमिनीवर निपचित पडलेले पाहिले तेव्हा आम्ही घाबरलो होतो. अपघातापासून ते हॉस्पिटलच्या प्रवासापर्यंत प्रत्येक मिनिट आमच्यासाठी वेदनादायक होता. जेव्हा डॉक्टरांनी आम्हाला सांगितले की तिला मेंदूच्या शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे, तेव्हा आम्ही आणखी घाबरलो. पण अंकुरा हॅास्पीटलच्या संपुर्ण टिमने आम्हाला वेळोवेळी आधार दिला. तिला नवे आयुष्य मिळवून देणाऱ्या या डॉक्टरांचे आम्ही कायमस्वरुपी आभारी आहोत अशी प्रतिक्रिया रुग्णाचे वडिल श्री नितीन सूर्यवंशी यांनी व्यक्त केली.
