फ्रंट पेज संस्थेतर्फे  विविध कला प्रकारांवर आधारित “इको” हे भारतातील विविध भागातील 14 चित्रकारांचे आगळे वेगळे प्रदर्शन पुण्यातील घोले रस्त्यावरील राजा रवि वर्मा कलादालन येथे 21 ते 25 मे 2025 दरम्यान आयोजन”

0

पुणे :इको प्रदर्शनाचा आज 25 मे रोजी शेवटचा दिवसपेंटिंग कलाप्रेमीनी जास्तीत जास्त सहभागी होण्याचे आयोजकांकडून आवाहनपुणे -फ्रंट पेज संस्थेतर्फे  पुण्यातील राजा रवि वर्मा कलादालन येथे  इको हे पेंटिंग प्रदर्शन पुण्यातील घोले रस्त्यावरील राजा रविवर्मा कलादालन येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन  प्रसिद्ध चित्रकार मिलिंद मुळीक  यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुण्या  म्हणून  राजश्री  दादरकर उपस्थित होत्या. यावेळी फ्रंट प्रेजच्या अर्चना पराडकर व केतन चित्रोडा आदी मान्यवर  उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनय पराडकर यांनी केले.या पेंटिंग भारतातील विविध भागातील 14 चित्रकारांनी सहभाग घेतला आहे. या प्रदर्शनामध्ये चारकोल आर्ट , अम्ब्रेला आर्ट, वारली, वॉटर कलर पेंटिंग, पॉइंटॅलिझम या विविध प्रकारच्या चित्रांचा समावेश प्रदर्शनामध्ये  करण्यात आला आहे. हे प्रदर्शन  पुण्यातील घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे 21 में ते  24  मे 2025 पर्यंत सकाळी 11 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत व 25 मे 2025 रोजी सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे तसेच या प्रदर्शनातील चित्रेही विक्रीसाठीही उपलब्ध असणार आहे . तरी कलाप्रेमींनी या प्रदर्शनास जास्तीत जास्त संख्येने भेट द्यावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

CAPTCHA


Translate »