जेईई मेन मध्ये बाकलीवाल ट्युटोरियलच्या विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी

पुणे – राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणातर्फे (एनटीए) जानेवारीत घेण्यात आलेल्या संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्यच्या (जेईई मेन्स) सत्र एक परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून यामध्ये बाकलीवाल ट्युटोरियलच्या विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी केली आहे. बाकलीवाल ट्युटोरीयल्सच्या अनुज पगार, कुशल थरानी आणि अपूर्व बंदिछोडे या विद्यार्थ्यांनी या निकालात जास्त गुण मिळवत आकाशाला गवसणी घातली. नवी मुंबईतील कुशल थरानी हा ९९.९९६८२६% गुणांसह तर सोलापूरचा अपूर्व बंदिछोडे हा 99.9865078 % अव्वल आला आहे. अनुज शिवप्रसाद पगार ९९.९८६४५९४% सह अव्वल आला आहे. बीटीच्या २० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ९९.९% आणि त्याहून अधिक गुण मिळवले. तर १६० हून अधिक विद्यार्थ्यांनी ९९% आणि त्याहून अधिक गुण मिळवले.

कुशल थरानी म्हणाला की, “जेईई मेन सत्र १ मध्ये मिळालेल्या निकालाबद्दल मी खूप आनंदी आहे पण एप्रिलमध्ये होणाऱ्या सत्र २ मध्ये चांगले गुण मिळवण्याचे माझे लक्ष्य आहे. माझ्या शिक्षकांनी मला प्रेरणा दिली आणि टॉप स्कोअर मिळविण्यासाठी दररोज एक मॉक पेपर सराव करण्यास सुचवले आणि म्हणूनच मी माझ्या बकलीवाल ट्युटोरियल्स शिक्षक, माझे पालक आणि माझ्या संपूर्ण तयारीच्या प्रवासात मला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो.”

अनुज शिवप्रसाद पगार म्हणाला की, “माझ्या शिक्षकांचा पाठिंबा आणि माझ्या पालकांच्या सततच्या प्रोत्साहनामुळेच मला हे शक्य झाले. मॉक टेस्टचा प्रकार, वेळेवर शंका दूर करणे, अत्यंत मार्गदर्शन केलेले प्रशिक्षण यामुळे मी जेईई मेन सत्र १ मध्ये मिळवलेल्या गुणांपर्यंत पोहोचलो.”

बाकलीवाल ट्युटोरियल्सचे संचालक वैभव बाकलीवाल यांनी उत्कृष्ट कामगिरीबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. बीटीसाठी यंदाचा हा निकाल पुण्यातील इतर कोणत्याही संस्थेच्या तुलनेने मोठ्या फरकाने सर्वाधिक आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदा यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या हि दुप्पट झाली आहे.

Leave A Reply

Translate »