एनईओएस टेलीस्टारने विक्रम मोडला: फक्त ४८ तासांत विकले ५० युनिट्स

0

पुणे: बाजारपेठेवरील वर्चस्वाचे दमदार प्रदर्शन करत, सिन्टेल बाय अरविंदने एनईओएस टेलीस्टार आयपी पीबीएक्स सिस्टिम हे आपले नवीन उत्पादन सादर करून यशाची नवी व्याख्या रचली आहे. बुकिंग्स सुरु झाल्यापासून अवघ्या दोन दिवसात कंपनीने तब्बल ५० युनिट्स विकून एक लक्षणीय टप्पा गाठला आहे. आपले वर्चस्व अधिक मजबूत करत उद्योगक्षेत्रातील नावीन्यामध्ये नवा मापदंड स्थापित केला आहे.

एनईओएस टेलीस्टार आयपी पीबीएक्समध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान, अखंडित एकत्रीकरण आणि इंट्यूटिव्ह डिझाईन यांचा मिलाप आहे, जो आधुनिक व्यवसायांच्या सातत्याने बदलत्या गरजा पूर्ण करतो. ऑक्टोबर २०२४ मध्ये मुंबई आणि दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमामध्ये या क्रांतिकारी उत्पादनाचे अनावरण करण्यात आले. तब्बल ३०० सहयोगी आणि वितरकांचे लक्ष या उत्पादनाने वेधून घेतले. जानेवारी २०२५ मध्ये बुकिंग्सना सुरुवात होईपर्यंत एनईओएस टेलीस्टार हे बिझनेस कम्युनिकेशनसाठी गोल्ड स्टॅन्डर्ड बनण्याच्या मार्गावर होते.

छोट्या टीम्सपासून मोठ्या व्यवसायांपर्यंत ही सिस्टिम १६ ते ६७० पोर्ट्सना (आयपी+टीडीएम) सपोर्ट करते, विविध आवश्यकता सहजपणे पूर्ण करते आणि एईएस-२५६ बिट एन्क्रिप्शन आणि सुरक्षित कम्युनिकेशनसाठी टीएलएस/एसआरटीपीसोबत प्रगत करता येते. या सिस्टीमची वेबवर आधारित मॅनेजमेंट टूल्स व्यवसायांना त्यांची नेटवर्क्स कुठूनही कॉन्फिगर व मॉनिटर करण्यासाठी सक्षम करतात, त्यामुळे रिमोट टीम्सचे प्रभावीपणे व्यवस्थापन करता येते. यामध्ये इनबिल्ट व्हॉइस लॉगर, व्हॉइसमेल, ऑटो-अटेंडंट, कॉन्फरन्सिंग आणि कॉल राऊंटिंग अशी इतरही अनेक वैशिष्ट्ये आहेत. विविध लोकेशन्सना सेंट्रलाइज्ड मॅनेजमेंटसाठी १२७ पर्यंत सिस्टिम्स आयपीवर कनेक्ट करता येतात आणि यामध्ये १२,००० मिनिटांची रेकॉर्डिंग्स स्टोर करता येतात.

सिन्टेल बाय अरविंदचे सीओओ श्री संदीप केरूळकर म्हणाले, “एनईओएस टेलीस्टारला प्रचंड प्रतिसाद मिळाला. फक्त ४८ तासांमध्ये ५० युनिट्स विकली जाणे ही बाब व्यवसायांचा आमच्या सुधारणात्मक कम्युनिकेशन सोल्युशन्स उपलब्ध करवून देण्याच्या क्षमतेवर असलेला विश्वास दर्शवते. हे फक्त एक उत्पादन नाही तर व्यवसायांसाठी गेम चेंजर आहे.”

एनईओएस टेलीस्टारने एक नवीन मापदंड रचला आहे, युवा स्टार्टअप्सपासून मोठ्या कॉर्पोरेट्सपर्यंत सर्वांना हे आवडले आहे. पारंपरिक टेलिफोनी आणि व्हीओआयपी क्षमता यांचा मिलाप म्हणजे व्यवसाय कनेक्टिव्हिटी, कार्यक्षमता आणि सुरक्षिततेकडे कसे जातात या दिशेने उचलण्यात आलेले महत्त्वाचे पाऊल आहे. ही अभूतपूर्व मागणी फक्त आकडे दर्शवत नाही तर व्यवसाय कम्युनिकेशनकडे ज्याप्रकारे पाहतात त्यामध्ये घडून आलेल्या परिवर्तनाचे प्रतिबिंब दर्शवते, आजच्या काळातील व्यवसायांसाठी कम्युनिकेशन हा त्यांच्या ऑपरेशन्सचा भविष्यात दीर्घकाळपर्यंत टिकून राहील असा, पुढे वाढवता येईल असा आणि सुरक्षित आधारस्तंभ असल्याचे यावरून दिसून येते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Translate »