डॉ. सुनीता तांदुळवाडकर यांची फोग्सीच्या ६३व्या अध्यक्षपदी नेमणूक

0

महिला आरोग्य सेवेचा करणार कायापालट विविध उपक्रमातंर्गत स्त्रियांच्या आरोग्यासंबंधीत गंभीर प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न


पुणे  – आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखल्या जाणाऱ्या सुप्रसिध्द वंध्यत्व निवारण तज्ज्ञ, एंडोस्कोपिक सर्जन आणि स्त्रीरोग तज्ज्ञ, डॉ. सुनीता तांदुळवाडकर, यांची FOGSI च्या ६३व्या अध्यक्षपदी नेमणूक झाली आहे जिओ वर्ल्ड कन्वेन्शन सेंटर येथे पार पडलेल्या ६७ व्या ऑल इंडिया काँग्रेस ऑफ ऑब्स्ट्रेटिक्स अँड गायनेकोलॉजी (AICOG २०२५) येथीला एका ऐतिहासिक क्षणी फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकोलॉजिकल सोसायटीस ऑफ इंडियाच्या(FOGSI) ६३व्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. 

डॉ. तांदुळवाडकर यांनी स्त्रियांच्या आरोग्यातील गंभीर प्रश्नांचा सामना करण्याची आणि देशभरात आरोग्यसेवा प्रणाली, शिक्षणामध्ये आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेत प्रगती घडवून आणण्याची प्रतिज्ञा करत या नव्या भूमिकेचा स्वीकार केला आहे.

भारतातील २७७ सोसायटीज मधील ४६,००० ऑब्स्टेट्रिशिअन्स आणि गायनेकोलॉजिस्ट्सचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या FOGSI सारख्या प्रभावी संस्थेचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे हा माझा आजपर्यंतच्या कार्याचा गौरव आहे आणि ही एक मोठी जबाबदारीसुद्धा आहे अशी प्रतिक्रिया डॉ. तांदुळवाडकर यांनी व्यक्त केली. या अध्यक्षपदामुळे स्त्रियांना ज्ञान आणि संसाधनांच्या साहाय्याने बळ देणारे उपक्रम सुरु करण्याची उत्तम संधी मिळते, ज्यातून जीवन अधिक निरोगी करण्याची आणि अधिक बळकट समाज उभारण्याची आपल्याला खात्री करता येते. स्वस्थ जन्म अभियान, नो युअर नंबर्स, आणि दो टीके जिंदगी के अशा अनेक उपक्रमातंर्गत, सक्रियपणे आरोग्या व्यवस्थापन करण्यास आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास प्राधान्य देण्यावर विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.

डॉ. तांदुळवाडकर यांच्या नेतृत्वाखाली भविष्यातील उपक्रम


1. संपूर्णा

2. नो युअर नंबर्स

3. दो टिके जिंदगी के

FOGSI आणि AICOG 2025 बद्दल

FOGSI, संपूर्ण भारतातील 46,000 हून अधिक प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञांचे प्रतिनिधित्व करते, वकिली, शिक्षण आणि संशोधनाद्वारे महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी समर्पित आहे. सध्या सुरू असलेली AICOG 2025 परिषद प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोगशास्त्रातील समस्या सोडवून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ म्हणून काम करते.

डॉ. सुनीता तांदुळवाडकर यांचे अध्यक्षपद हे FOGSI च्या गौरवशाली इतिहासातील एक नवा अध्याय आहे. त्यांच्या दूरदर्शी उपक्रमांचा उद्देश हा आरोग्यसेवा आव्हानांना तोंड देणे, महिला सक्षमीकरण आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी एक निरोगी भविष्य घडवणे हे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Translate »