प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर नंतर ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्याकडून चंद्रकांतदादा पाटील यांचे कौतुक

पुणे: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी डॉ. माशेलकर यांनी चंद्रकांतदादा पाटील यांच्या कामाचे भरभरुन करत, कोथरुडकरांना माणसं जोडणारा हिरा गवसला असल्याचे गौरवोग्दार काढले.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढायला सुरुवात झाली आहे. कोथरुडचे आमदार आणि राज्याचे विद्यमान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी उमेदवारी जाहीर झाल्यापासून प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. आज चंद्रकांतदादा पाटील यांनी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले.

यावेळी चंद्रकांतदादांनी आपल्या गत पाच वर्षाच्या कार्याचा कार्य अहवाल डॉ. माशेलकर यांच्याकडे सादर केला, तो त्यांनी सविस्तर पाहिला. पाच वर्षांत केलेल्या कामांची यादी आणि उपक्रम पाहून डॉ. माशेलकर यांनी चंद्रकांत दादांचे मनापासून कौतुक केले. यावेळी चंद्रकांतदादांच्या कोथरुड मधील आरोग्य विषयक योजनांची डॉक्टरांनी आवर्जून माहिती घेतली.

कोथरुड ही राज्याची संस्कृतिक राजधानी आहे. इथे प्रत्येक व्यक्तीची एक वेगळीच ओळख आहे. खरंतर एखादा व्यक्ती विशेष करुन राजकीय व्यक्ती मोठ्या पदावर पोहोचल्यावर त्याच्या स्वभावातही फरक पडतो. विनयशिलता, नम्रपणा कमी होतो. पण चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्यालातील विनयशीलता, नम्रपणा आणि समाजाप्रती समर्पित होऊन काम करण्याचा गुण सोडलेला नाही. गेल्या पाच वर्षात चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून कोथरुडकरांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. चंद्रकांतदादा पाटील यांच्या रुपाने कोथरुडकरांना माणसं जोडणारा हिरा गवसला आहे, असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.

यावेळी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनीही कृतज्ञता व्यक्त केली. दरम्यान, यावेळी डॉ. माशेलकर यांनी चंद्रकांतदादा पाटील यांच्या गुरु पौर्णिमेनिमित्तच्या गुरुपूजन उपक्रमाचेही भरभरुन कौतुक केले. तसेच, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्येष्ठ पत्रकार डॉ. सागर देशपांडे हे देखील उपस्थित होते.
यांच्या कडून चंद्रकांतदादांच्या कामाचे कौतुक*

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी उमेदवारी जाहीर झाल्यापासून जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. काल उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आज सकाळी पासून विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या आणि प्रथितयश व्यक्तींच्या भेटी-गाठी घेण्यास सुरुवात केली आहे. आज आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संगणक तज्ज्ञ तथा प्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांची चंद्रकांतदादा पाटील यांनी भेट घेतली. यावेळी डॉ. भटकर यांनी चंद्रकांतदादांच्या कार्याचे कौतुक केले.

भारतीय जनता पक्षाकडून चंद्रकांतदादा पाटील यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आज सकाळी कोथरूड मधील विठ्ठल मंदिरात काकड आरतीला उपस्थिती लावली. त्यानंतर आज विविध क्षेत्रातील मान्यवर आणि प्रथितयश व्यक्तींच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली.

या भेटीमध्ये चंद्रकांतदादा पाटील यांना व्यापक समर्थन मिळत असून, प्रत्येक भेटीमध्ये त्यांचे आदरपूर्वक स्वागत केले जात आहे. त्यामुळे नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत प्रचारात आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. आज प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ विजय भाटकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी घेतल्या. यावेळी डॉ. भटकर यांनी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले.

यासोबतच चितळे बंधू मिठाईवालेचे संजय चितळे, इंद्रनील चितळे, प्रसिद्ध कथक नृत्यांगना गुरु शमा भाटे, विनीत कुबेर, रवींद्र घाटपांडे, भूपाल पटवर्धन, डॉ. दीपक शिकारपूर आदींच्या भेटीगाठी घेऊन, अनौपचारिक संवाद साधला.

Leave A Reply

Translate »