आमदार झाल्यापासून कोथरूड मतदार संघातील वर्षानुवर्षे प्रलंबित कामे मार्गी लावली : चंद्रकांतदादा पाटील

गेल्या निवडणुकीत आशिष गार्डन जवळील डीपी रोडवरील अतिक्रमणाचा प्रचंड मुद्दा तापला होता. या अतिक्रमणामुळे सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना इथल्या नागरिकांना करावा लागत होता. सदर अतिक्रमण हटविण्यात कोणालाही यश येत नसल्याने आसपासच्या सोसायटींनी मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली होती‌. दादांनी निवडणुकीनंतर सदर अतिक्रमण हटविण्यात येईल, असे आश्वस्त केले होते. त्यानुसार निवडणुकीनंतर तात्काळ अतिक्रमण हटवून इथली वाहतूक कोंडीची समस्या सोडविली.

मतदारसंघातील बाणेर बालेवाडी हा झपाट्याने विकसित होणारा भाग. या भागातील वाढत्या नागरिकरणामुळे पाणी पुरवठ्याचा प्रश्न अतिशय अडचणीचा ठरला होता. पाण्यामुळे इथले नागरिक त्रस्त होते. महापालिकेच्या २४×७ योजनेअंतर्गत पाण्याची टाकी मंजूर असूनही पूर्णत्वास येत नव्हती. त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. त्यामुळे दादांनी या कामाला गती देण्यासोबतच लोकसहभागातून १८ कोटी लिटर पाणी बाणेर उपलब्ध करुन दिले. तसेच, मे २०२३ मध्ये पाण्याची टाकी पूर्ण करुन नागरिकांची पाण्याची समस्या मिटवली.

कोथरुड मतदारसंघ हा सोसायट्यांचा मतदार संघ. त्यामुळे येथील आनंदनगर सोसायटीचा डिम्ड कन्व्हेयन्सचा प्रश्न २५ वर्षांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी लावून इथल्या नागरिकांना मोठा त्रास संपवला.

स्वप्नशिल्प ही कोथरुमधील सर्वात मोठी सोसायटी. ही सोसायटी म्हणजे एक गावच म्हटलं पाहिजे. या सोसायटी लगत महावितरणचा डीपी असल्याने इथले नागरिक नेहमीच वेगळ्या भितीमध्ये असायचे. अनेक वर्षे मागणी करुन ही मागणी पूर्ण होत नव्हती. मात्र,सोसायटीतील पदाधिकाऱ्यांनी दादांसमोर आपली व्यथा मांडली. त्यानंतर दादांनी तात्काळ महावितरणच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन स्पष्ट शब्दात निर्देश दिले. अन् हा डीपी स्थानांतरित करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे इथल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

पुणे महापालिकेकडून १९७० पासून मिळकतकरात ४० टक्‍के सवलत दिली जात होती, पण राज्य सरकारने केलेल्या ऑडिटमुळे ही सवलत काढण्याचा महापालिकेकडून निर्णय झाला. त्यामुळे २०१९पासून १०० टक्के कर वसुली सुरू करण्यात आली. याचा सर्वाधिक फटका कसबा आणि कोथरुड मधील नागरिकांना बसत होता. ही सवलत पुन्हा लागू करावी अशी मागणी जोर धरत होती. त्यामुळे दादांनी या विषयात जातीने लक्ष्य घालून मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन सदर सवलत पुन्हा लागू करुन घेतली. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला.

पुणे महानगरपालिकेच्या विकास आराखड्यामध्ये औंध हद्दीतील सर्वे नंबर 158 व 159 मध्ये 18 मीटर डीपी रस्त्याचे प्रयोजन करण्यात आले होते. बाणेर गावाचा पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यानंतर हा रस्ता सरकवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. हा रस्ता झाला तर औंध-बाणेरमधील वाहतूक कोंडीची समस्या सुटणार होती. पण या प्रस्तावाला ३० वर्षे होऊनही त्यावर अंमलबजावणी होत नव्हती. अखेर दादांनी स्वतः लक्ष घालून हा विषय मार्गी लावला. तब्बल 30 वर्षानंतर पुणे महानगरपालिकेने बाणेर हद्दीमध्ये दिलेल्या झोनींग दाखल्यामुळे औंध बाणेर हद्दीवरील सर्वे नंबर 158 लगत असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते नागरस रस्ता 60 फुटी डीपी रस्ता करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुसलमान समाजाला सुतारवाडीत कब्रस्तान (दफनभूमी) म्हणून दिलेल्या जागेचा उपयोग इतर धार्मिक कार्यांसाठी करणे, कब्रस्तानच्या जागेत मशीद उभी करणे, नमाजपठण करणे, धार्मिक शिक्षण देणे आदी कृत्यांतून मुसलमानांकडून वर्चस्व प्रस्थापित करणे चालू होते. या सर्व प्रकारांच्या विरोधात स्थानिक हिंदु बांधवांनी एकत्र येऊन संघर्ष उभा केला; मात्र अनधिकृत बांधकाम (मशीद) पाडण्यासाठी हिंदूबहुल भागात हिंदूंना प्रशासनाशी तब्बल १५ वर्षांपेक्षा जास्त काळ लढा द्यावा लागला. अखेर दादांनी यामध्ये स्वतः लक्ष्य घालून हे अनाधिकृत बांधकाम हटविण्याच्या सूचना आयुक्तांना दिल्या. त्यानुसार महापालिका आणि पोलीस विभागाने संयुक्त कारवाई करुन हे काम हटवले. त्यामुळे सुतारवाडीतील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

चांदणी चौक म्हणजे पश्चिम पुण्याचे प्रवेशद्वार. वारंवार वाहतुक कोंडीमुळे इथले नागरिक त्रस्त होते. त्यामुळे चांदणी चौकाचा विस्तार व्हावा यासाठी दादांनी नितीन गडकरींकडे पाठपुरावा करुन हा मार्ग पूर्ण करुन घेतला.

पश्चिम पुण्याचे प्रवेशद्वार असलेल्या चांदणी चौक प्रकल्पाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण झाल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला. सदर भागात पाषाण-बावधन-कोथरुडकडून मुंबईकडे आणि मुळशीकडून सातारा व पाषाण-कोथरुडकडे जाण्यासाठी धोकादायक पद्धतीने महामार्ग ओलांडून जावे लागत होते. त्यामुळे याठिकाणी पादचारी पूल उभारणे आवश्यक होते. त्यासाठी दादांनी यासाठी पाठपुरावा करुन चांदणी चौकात पादचारी पुलासाठी निधी मंजूर करुन घेतला. नुकताच त्याकामाचा शुभारंभ देखील झाला.

पाच वर्षापू‌र्वी २०१९ मध्ये शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील प्रमुख नाला असलेल्या आंबिल ओढ्याला पूर आला होता. पुराचे पाणी अनेक सोसायट्यांमध्ये घुसले. काही सोसायट्यांच्या सीमा भिंती पडून नुकसान झाले. नाल्यांना येणारा पूर रोखण्यासाठी सीमा भिंत बांधणे आवश्‍यक असल्याने महापालिकेने काही ठिकाणी भिंती बांधल्या, काही भागात पूल बांधले पण, इतर भागात तांत्रिक कारणामुळे पालिकेला हे काम करता आले नाही. त्यामुळे कोथरुडसह शहरातून वाहणाऱ्या नाल्यांना सीमाभिंत असावी यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्यासाठी मविआ सरकारमधील तत्कालीन अर्थमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन ही दिले होते. महायुती सरकार अस्तित्वात आल्यानंतर दादांनी हा विषय प्रभावीपणे पुढे नेऊन २०० कोटींचा निधी मंजूर करुन आणला.

कोविड काळातील चंद्रकांतदादा पाटील यांच्या कामाचा संपूर्ण राज्याने आदर्श घेतला. मतदारसंघातील एक ही नागरिक उपाशी राहू नये यासाठी धान्य उपलब्ध करून देण्यासोबतच बाधितांना स्वखर्चाने कोविड केअर सेंटर कार्यान्वित करणारे राज्यातील एकमेव लोकप्रतिनिधी होते. याशिवाय बाधितांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत औषधे उपलब्ध करून देणे, आरोग्य रक्षकांना पीपीई कीट, शतप्लस औषध देऊन त्यांची सुरक्षा असे एक ना अनेक कामे करुन आदर्श लोकप्रतिनिधीचा वस्तूपाठ घालून दिला. एवढाच नाही, तर महापालिकेच्या माध्यमातून बाणेर मध्ये उभारण्यात येणाऱ्या कोविड सेंटरला आपल्या आमदार निधीतून तब्बल दीड कोटींचा निधी उपलब्ध करून दिला.

याशिवाय कोथरुड हेच आपलं कुटुंब मानून, कुटुंबातील सदस्याप्रमाणे मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांची काळजी घेणारे दादा म्हणजे राजकीय व्यक्तीसाठी एक प्रेरणा निर्माण केली आहे. महिन्याला सरासरी तीन सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनातील गरजा पूर्ण केल्या आहेत.

कोथरूड मधील प्रत्येक मुलगी ही आपली लेक आहे, हे मानून त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. त्यात प्रामुख्याने मानसी उपक्रमाच्या माध्यमातून वस्ती भागातील मुलींच्या व्यक्तीमत्व विकासावर भर दिला. तर सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून कोथरूड मधील हजारो मुलींचे पालकत्व घेतले.

प्रत्येक कोथरुडकराचे आरोग्य उत्तम रहावे यासाठी मोफत फीरता दवाखाना, आरोग्य शिबीर, मोतिबिंदूमुक्त कोथरुड असे विविध उपक्रम राबविले. त्यासोबतच रुग्णालयातील रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ कोटींची मदत उपलब्ध करून दिली.

बाणेर-बालेवाडी भागातील वीज समस्या कायमस्वरूपी संपुष्टात आणण्यासाठी वीज उपकेंद्राची आवश्यकता होती. याबाबत सातत्याने मागणी करण्यात येत होती. नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे वीज उपकेंद्र निर्मितीकरिता बालेवाडी येथील सर्व्हे न ४/१ येथील ६५ गुंठे जागा देण्यात आली आहे. वीज उपकेंद्रासाठी केलेल्या पाठपुराव्यामुळे बाणेर-बालेवाडी भागातील वीजपुरवठ्याची समस्या कायमस्वरूपी सुटण्याचा मार्ग मोकळा झाला.

Leave A Reply

Translate »