‘कलार्पण’ फॅशन शो, खास आकर्षण मराठी अभिनेत्री सायली संजीव आणि वय वर्षे ५ ते १५ बाल चमू

0

पुणे – आबंध आर्ट्स तर्फे भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणार्‍या विविध कलाप्रकारांवरून प्रेरित कलात्मक पोशाखांचे सादरीकरण ‘कलार्पण’ या
फॅशन शो च्या माध्यमातून उद्या, दि. २७ जुलै रोजी दु. १२.३० सिद्धार्थ पॅलेस, कोथरूड येथे होणार आहे. आधुनिक वस्त्र प्रावरणांमधून भारतीय प्राचीन संस्कृती, आदिवासी कला याचे जतन करणे हे आबंध आर्ट चे वैशिष्ट्य. याच संकल्पनेवर आधारित फॅशन शो मध्ये सुप्रसिध्द अभिनेत्री सायली संजीव शो स्टॉपर असणार असून युवक आणि युवती व्यतिरिक्त वय वर्षे ५ ते १५ या वयोगटातील मुले मुली आणि त्यांचे रॅम्प वरील सादरीकरण हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Translate »