आरोग्य आणि नेत्रदानाच्या जनजागृतीसाठीची “रन टू रिबॉर्न” मॅरेथॉन स्पर्धा पार पडली.

0

पुणे- सध्याचा काळात बदलणारी जीवनशैली, अनियमित दिनचर्या, प्रदूषण आणि मानसिक ताण जास्त प्रमाणात वाढल्याने बहुतेक लोकांना आरोग्याच्या आणि डोळ्यांच्या त्रासाला सामोरा जावं लागतं. त्यामुळे निरोगी दीर्घआयुष्य जगण्यासाठी आणि लोकांमध्ये नेत्रदानाची जनजागृती करण्यासाठी “रन टू रिबॉर्न” या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. फिटकव्हर ३६० अंतर्गत एबीएस जिम आणि डॉ. दुधभाते नेत्रालय आणि रेटीना सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने या मॅरॅथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. नांदेड सिटीमधील अँफीथीएटर येथून सकाळी सहा वाजल्यापासून स्पर्धेला सुरू झाली. दहा किलोमीटर, पाच किलोमीटर, तीन किलोमीटर अशा टप्प्यांमध्ये अनेक अबालवृद्ध स्पर्धक स्वेच्छेने आणि आनंदाने सहभागी झाले होते.

४० वर्षाखालील पुरुष वयोगटात भालचंद्र मुरकुटे तर महिला गटात शीला नागरकर विजेते झाले. खुल्या वयोगटात रुद्रमणी शर्मा विजयी झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अभिमन्यू साबळे, एबीएस जिमचे संस्थापक आणि संयोगिता घोरपडे( बॅडमिंटन पटू) आणि डॉ. दूधभाते नेत्रालय आणि रेटिना सेंटरचे संस्थापक डॉ. अनिल  दुधभाते, फिट कव्हर 360 संस्थेचे संस्थापक शुभम प्रभाकर कैरमकोंडा आणि संचालक सागर सदाशिव इंगळे उपस्थित होते. डॉ.  दुधभाते नेत्रालयातील सीइओ प्रियंका एडके, मुख्य व्यवस्थापक शितल हिरळकर, डॉ. स्नेहल मानपुत्र, एचआर श्रुती उबाळे, अंकित शुक्ला व एबीएस जिमचे शुभम चव्हाण, सुनयना चव्हाण, वर्षा इंगळे, आसावरी चव्हाण आणि इतर सर्व कर्मचारी सदस्य -उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.

Translate »