देशात नागरिकांचा कल इंडिया आघाडीच्या बाजूने – हेमंत पाटील 

पुणे : देशात इंडिया आघाडी आणि एनडीए यांच्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चुरस पाहायला मिळत आहे. ‘मोदी हटाओ, देश बचाओ’,चा नारा देत इंडिया आघाडीने देशात प्रत्येक लोकसभा मतदार संघात चांगले उमेदवार दिले असून त्यांचा प्रचार देखील जोरदार सुरू आहे. त्यामुळे या निवडणुकीत इंडिया आघाडीला चांगले यश मिळेल, असा आशावाद इंडिया अगेंस्ट करप्शनचे  राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. 

पुढे बोलताना हेमंत पाटील म्हणाले,  लोकसभा निवडणुक 2024 ही सात टप्प्यात होणार असून महाराष्ट्रात पाच टप्प्यात ही निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारा पर्यंत जाऊन प्रचार करण्याचा फायदा देखील इंडिया आघाडीला होताना दिसत आहे. सध्या महागाई, बेरोजगारी याने सामान्य नागरिक त्रस्त असून हे नागरिक इंडिया आघाडीला मतदान करतील असा, सर्वसामान्यांचा कल असल्याचे देखील पाटील यांनी सांगितले. 

दरम्यान, विदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराची सुरूवात चंद्रपूर येथून करीत आहे. येथे भाजपच्या वतीने सुधीर मूनगुंटीवार उभे असून महाविकास आघाडीच्या वतीने प्रतिभा धानोरकर निवडणूक लढावीत आहेत. मात्र, मोदींच्या या प्रचाराचा देखील फारसा काही उपयोग होणार नाही, कारण सामान्य नागरिक भाजप विरोधात आहेत असा दावा हेमंत पाटील यांनी केला आहे.

Leave A Reply

Translate »