परांजपे मराठी प्राथमिक विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

0

पुणे : लॉ कॉलेज रोड येथील महाराष्ट्र विद्या मंडळाच्या परांजपे मराठी प्राथमिक विद्यालयामध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून संस्थेच्या चिटणीस शिवानी डोंगरे व माजी नगरसेविक माधुरीताई सहस्त्रबुद्धे उपस्थित होत्या. याप्रसंगी सर्व क्षेत्रातील उच्च विभुषित महिला मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते. वकील, पोलीस, इंजिनिअर, नगरसेवक, डॉक्टर, उद्योजिका, खेळाडू ,बँक मॅनेजर, प्राध्यापिका अशा सर्व क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या महिलांना आमंत्रित करून शाल व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विद्यार्थिनी व पालकांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका सुषमा भोसले यांनी केले. प्रस्तावना व प्रास्ताविक निलिमा कर्णे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली बंगाळे यांनी केले. विष्णू गवारी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Translate »