कोढव्यातील श्रीराम मंदिरात प्राण प्रतिष्ठा महोत्सवचे आयोजन

0

पुणे :  प्रभू श्रीराम अयोध्येतील राम मंदिरात येत्या सोमवारी (दि. २२ जानेवारी) विराजमान होत आहेत. श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याने संपूर्ण देश राममय झाला असून, हा आनंदसोहळा साजरा करण्यासाठी सोमवारी (दि. २२) प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठा महोत्सवाचे आयोजन एनआयबीएन, उंड्री रोड, कौसर बाग, कोंढवा, पुणे येथील राम दरबार मंदिर  (संकट हरण महादेव मंदिर) यांच्यावतीने करण्यात आले आहे.
 प्राण प्रतिष्ठा महोत्सवा अंतर्गत  22 जानेवारी रोजी दुपारी 12.00, थेट प्रक्षेपण  दाखवणार आहेत. दुपारी ४ वाजता कलश यात्रा साळुंके विहार ते  माता मंदिर रामदरबार मंदिर पर्यंत काढण्यात येईल.  तसेच  संध्याकाळी ५ वाजता भजन, संध्याकाळी ६ वाजता दीपोत्सव, संध्याकाळी ७.४५
अयोध्येतील शरयूतीरी महा आरती आणि प्रसादाचे आयोजन केले आहे.
  महाआरती होत असल्याने अधिकाधिक पुणेकरांनी उपस्थित राहावे,” असे आवाहन पवन बन्सल, नरेंद्र गोयल राम दरबार सेवक मंडळाने केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Translate »