राजकीय गद्दारांविषयीचा राग “बाळकडू” व्यंगचित्र प्रदर्शनातून व्यक्त होणार

0

खा. संजय राऊत यांच्या हस्ते होणार बाळकडू व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

पुणे – शिवसेना पक्षात झालेली गद्दारी, पक्ष फुटी आणि एकंदरीत शिवसेना आणि सत्तेसाठी लालची झालेल्या राजकारण्यांचे व्यंगचित्र “बाळकडू २” या राजकीय आणि सामाजिक व्यंगचित्र प्रदर्शनातून व्यक्त करण्यात येत आहे. “बाळकडू २” व्यंगचित्र प्रदर्शन हा महाराष्ट्रात मागील वर्षात राजकीय उलथापालथीवर कुंचल्याच्या माध्यमातून ओढलेला आसूड असून व्यंगचित्रकार अमित पापळ यांनी ही व्यंगचित्र रेखाटली आहेत. बालगंधर्व कलादालन येथे या व्यंगचित्रांचे प्रदर्शन दिनांक १६ ते १८ जानेवारी रोजी होणार असून याचे आयोजन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पुणे शहर प्रसिद्धी प्रमुख अंनत घरत यांनी केले आहे. याचे उद्घाटन दिनांक १६ जानेवारी रोजी सकाळी ११:०० वा. शिवसेना नेते खा. संजय राऊत यांच्या हस्ते होणार असून यावेळी शिवसेना पक्ष आणि महाविकास आघाडीतील शहर प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. 

Leave A Reply

Your email address will not be published.

Translate »