माधुरी दीक्षित-नेने यांना सूर्यदत्त ग्लोबल बिझनेस फोरमतर्फेजयपूर येथे ‘सूर्यभारत ग्लोबल अवॉर्ड-२०२३’ प्रदान

0

जागतिक स्तरावर व्यवसायवृद्धी, आदानप्रदानाला प्रोत्साहन देण्यासाठी सूर्यदत्त ग्लोबल बिझनेस फोरमची स्थापना : प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया

पुणे : सूर्यदत्त ग्लोबल बिझनेस फोरमतर्फे (एसजीबीएफ) देण्यात येणारा पहिलाच ‘सूर्यभारत ग्लोबल अवॉर्ड-२०२३’ प्रख्यात अभिनेत्री पद्मश्री माधुरी दीक्षित-नेने यांना प्रदान करण्यात आला. जयपूरमध्ये (राजस्थान) झालेल्या दिमाखदार सोहळ्यात सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व ‘एसजीबीएफ’चे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व उपाध्यक्षा सुषमा संजय चोरडिया यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. मानपत्र, सन्मानचिन्ह, मेडल व स्कार्फ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. बॉलिवूड सुपरस्टार माधुरी दीक्षित-नेने जयपूरमध्ये आल्या होत्या. यावेळी प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी माधुरी दीक्षित यांच्यांशी संवाद साधला. सूर्यदत्त ग्रुप यंदा रौप्य महोत्सवी साजरे करत असल्याचे सांगून चित्रपट सृष्टीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल सूर्यदत्त ग्लोबल अवॉर्डने माधुरी यांचा गौरव केला.

माधुरी दीक्षित-नेने यांनी ‘सूर्यदत्त’च्या २५ वर्षांच्या वाटचालीचे कौतुक केले. ‘सूर्यदत्त’चा हा पुरस्कार नम्रपणे स्वीकारत असल्याचे नमूद करत माधुरी म्हणाल्या, ‘समाजातील चांगल्या व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करून विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. तसेच नव्याने स्थापन केलेला सूर्यदत्त ग्लोबल बिझनेस फोरम जगभरातील उद्योजकांना एका व्यासपीठावर आणून व्यवसायाची आदानप्रदान करण्याची संधी निर्माण करत आहे, असे माधुरी दीक्षित यांनी आवर्जून सांगितले.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “उद्योग करणाऱ्या व करू इच्छिणाऱ्या समविचारी लोकांना एकत्र आणण्यासाठी ‘एसजीबीएफ’ महत्वाची भूमिका बजावेल. स्थापनेच्या पहिल्याच वर्षी दिला जाणारा पुरस्कार माधुरी दीक्षित यांना प्रदान करताना आम्हाला आनंद होत आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील आपल्या कार्यातून, कलेच्या सादरीकरणातून ज्यांनी भरीव योगदान दिले आहे, अशा महान व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. जागतिक स्तरावर व्यवसायवृद्धी, उद्योगांच्या आदानप्रदानाला प्रोत्साहन देण्यासाठी सूर्यदत्त ग्लोबल बिझनेस फोरमची स्थापना करण्यात आली आहे.”

“या फोरमच्या माध्यमातून उद्योजकांना मार्गदर्शन, व्यासपीठ देण्याचा प्रयत्न आहे. सर्वच स्तरातील लोकांना एकत्र आणत विविध प्रकारची चर्चासत्रे, परिषद, कार्यक्रम घेतले जाणार आहेत. उद्योग व शिक्षण क्षेत्रातील गेल्या ४० वर्षांच्या अनुभवाचा लाभ भावी पिढीला देण्याचा यामागे उद्देश आहे. जगभरातील विविध संस्था, कंपन्या, फोरम, असोसिएशनवर सदस्य, फेलो म्हणून काम करताना आलेले अनुभव, मिळालेले ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे. ‘शेअरिंग इज ग्रोइंग’ आणि ‘नेटवर्किंग इज नेटवर्थ’ या दोन तत्वांवर माझे काम सुरु आहे,” असे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले.

———————

सूर्यदत्त ग्लोबल बिझनेस फोरम

भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जी-२० परिषदेची संकल्पना ‘एक जग, एक कुटुंब, एक भविष्य’ या अनुषंगाने जागतिक स्तरावर व्यवसायांच्या समृद्धीसाठी उद्योजकांचा समुदाय तयार करण्यासाठी आणि  व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी सूर्यदत्त ग्लोबल बिझनेस फोरमची (एसजीबीएफ) स्थापना करण्यात आली आहे. कोरोनाच्या काळात सुचलेल्या या कल्पनेला १६ ऑक्टोबर २०२३ रोजी मूर्त स्वरूप मिळाले. भारत सरकारच्या मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत यासह जगभरातील संधींचा लाभ घेण्यासाठी हे फोरम महत्वपूर्ण ठरणार आहे. स्टार्टअप्स, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग आणि इतर मोठ्या कंपन्यांना एकत्रित आणून सामूहिक व्यवसायवृद्धीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष, ग्लोबल कोच, उद्योग व व्यवस्थापनातील तज्ज्ञ ज्यांना २५ वर्षांपेक्षा अधिक अधिक उद्योग क्षेत्रात, ३० वर्षांपेक्षा अधिक शिक्षण क्षेत्रात अनुभव असून, ज्यांचा २० वर्षांपेक्षा अधिक काळ जागतिक स्तरावर वावर आहे, अशा प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या संकल्पनेतून ‘एसजीबीएफ’ची स्थापना झाली आहे. इंग्लंड, फ्रांस, इटली, मॉस्को, ऑस्ट्रेलिया, जपान, सिंगापूर आदी देशांत त्यांना कुलगुरूंच्या परिषदांसाठी निमंत्रित करण्यात येते. उच्च शिक्षणात आवश्यक सुधारणांसाठी होणाऱ्या बैठकांना त्यांना बोलावले जाते. अनेक संस्था व विद्यापीठांशी सूर्यदत्त संस्थेला सामंजस्य कराराच्या मार्फत जोडले आहे. इन्स्टिट्यूट ऑफ डायरेक्टर्सचे आजीवन सदस्य, पॅट्रोन मेम्बर, संस्थापक सदस्य, अशा विविध जबाबदाऱ्या प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तवरावरील संस्थांवर सांभाळत आहेत, असे सुषमा चोरडिया यांनी नमूद केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Translate »