हर्षित अभिराज यांची गाणी हृदयाला भिडतात – मेधा कुलकर्णी 

‘”मेरी माँ” या गीताच्या ध्वनिफितीचे प्रकाशन

पुणे: डॉ. एस. पी. बालसुब्रमण्यम, अनुराधा पौडवाल, कवीवर्य  ना. धो. महानोर,  सोनू निगम, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम या दिग्गजांनी कौतुकाची थाप पाठीवर देवून गौरविण्यात आलेला सुप्रसिद्ध संगीत हर्षित अभिराज गीते हृदयाला भिडतात असे प्रतिपादन मेधा कुलकर्णी यांनी केले.नवरात्रौ उत्सवाचे औचित्य साधून व नारी शक्तीला प्रेरणादायी तसेच जगभरातील प्रत्येक आईला अर्पण केलेले “मेरी माँ” या गीताच्या ध्वनिफितीचे प्रकाशन श्रमिक पत्रकार भवन, पुणे या ठिकाणी मोठ्या दिमाखात पार पडले. या प्रसंगी मा. आमदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, प्रसिद्ध संगीतकार हर्षित अभिराज, निर्माते उदय गाडगीळ आणि चित्रपट दिग्दर्शक रामकुमार शेडगे आदी मान्यवर उस्थितीत होते. 

हर्षित अभिराज म्हणाला की मेरी  माँ हे हिंदी मी स्वतः संगीतबद्ध केले असून गीताचे बोल व गायन माझे स्वतःचे आहे. तर या गीताचे निर्माते उदय गाडगीळ उगम म्युझिकयांनी केले आहे. “ऐ खुदा तेरी जन्नतसे भी खूबसूरत  मेरी  माँ “मेरी  सांसें  मेरी धडकन मेरा तीरथ मेरी  माँ ” असे या गीताचे बोल आहेत. मेधा कुलकर्णी म्हणाल्या की हर्षित अभिराज यांचे संगीत क्षेत्रातील योगदान खूप मोठे आहे. त्यांची गीते सहजपणे ओठावर रुळतात. दूरच्या रानात, नादखुळा नादखुळा, ढगाण आभाळ दाटला गं अशी एकापेक्षा एक गीते हृदयाचा ठाव घेतात. मेरी माँ हे त्यांचे गीत रसिकांच्या भेटीला आले. प्रत्येक आईला समर्पित असलेले गीत रसिकांना नक्की आवडेल असे आहे. स्वतः गीतकार, गायक आणि संगीतकार असा हर्षित यांनी त्रिवेणी संगम साधला आहे. गाडगीळ म्हणाले की अबाल वृद्धांना आपल्या संगीताची मोहिनी घालणारा नादखुळा संगीतकार, तर दूरच्या रानातून केळीच्या बनात साद घालणारा पार्श्वगायक ज्याच्या संगीताची जादू दाही दिशांना  मोहवून टाकते,  असा हा   संगीतकार आणि पार्श्वगायक हर्षित  अभिराज  गेल्या दोन दशकांपासून रसिकांच्या मनावर संगीताचे गारूड घालत आहे. दिग्दर्शक रामकुमार शेडगे म्हणाले की दोन पिढ्यांना समृद्ध करणार्‍या दूरच्या रानात ते  रौंदळ पर्यंत आणि अजूनही अव्याहतपणे चालू या गीतातून तो बॉलिवूडमध्येही पदार्पण करतोय. हर्षित अभिराज यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि गायलेल्या गाण्यांच्या यू ट्यूब  वरील एकूण व्ह्यूजनी आता ३५ करोड चा टप्पा पार केलाय.हर्षित अभिराज म्हणाले की डॉ. एस पी बालसुब्रमण्यम , अनुराधा पौडवाल , कवीवर्य  ना धो महानोर,  सोनू निगम, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम,  प्रसिद्ध अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री अशा मान्यवर व्यक्तीनी हर्षित  अभिराजच्या कामाचं कौतुक केलं आहे. आपल्या  दर्जेदार  संगीत रचनांसोबतच आपल्या उत्तम आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणार्‍या हर्षित अभिराज यांचे ६५० हून अधिक स्टेज शोज भारतभर आणि परदेशात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाले आहेत़

Leave A Reply

Translate »