आनंदी जीवन जगण्यासाठी योग निद्रा शिबीराचे आयोजन

0

पुणे: चिंता, नैराश्य, ताण-तणावापासून मुक्तीसाठी व आनंदी जीवन जगण्यासाठी कोथरूड येथील ऋषी चैतन्य योगा अँड मेडिटेशन सेंटरच्या वतीने योग निद्रा शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. योगनिद्रेची अनुभूती घेण्यासाठी रविवार दिनांक १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता आगरकर रोडवरील बीएमसीसी कॉलेज जवळील दादासाहेब दरोडे हॉल येथे योगनिद्रा विशेष सत्र होणार आहे. परमपूज्य आनंदमूर्ति गुरुमाँ भक्तपरिवारातर्फे भारतातील ४० शहरामध्ये एकाचवेळी हे सत्र पार पडणार आहे. हे शिबीर निःशुल्क असून यामध्ये सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी मात्र आवश्यक आहे. यासाठी ८४५९२९१६८८ यावर संपर्क करावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Translate »