शाश्वत विकासासाठी उपलब्ध जलसाठ्यांचे नियमन आवश्यक

भविष्यात पाण्यामुळे चौथे महायुध्द होण्याची शक्यता
डॉ.संजय चहांदे यांचे प्रतिपादनः‘अन्न,सौरऊर्जा व पर्यावरणासाठी पाणी संवर्धन ’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

पुणे: वाढती लोकसंख्या, कमी होत जाणारे कृषीक्षेत्र आणि भूजलाचा बेसुमार उपसा, यामुळे देशातील उपलब्ध जलसाठ्यांवर विपरीत परिणाम होत आहेत. शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्याच्या मार्गात उपलब्ध जलसाठ्यांच्या नियमनाचे आव्हान असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र वॉटर रिर्सोस रेग्यूलेटरी अथॉराइजचे सेवानिवृत्त अध्यक्ष डॉ. संजय चहांदे यांनी केले. तसेच भविष्यात पाण्यावरून चौथे महायुद्ध होईल त्यासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे आणि तो मौल्यवान (अकाऊंटेबल) आहे, याविषयी सर्व समाजघटकांत जाणीवजागृती अत्यावश्यक आहे.

यातूनच पाणी,अन्न आणि उर्जासुरक्षेचे ध्येय साध्य करता येईल. ओम एल आय चॅप्टर,पुणे (इंडिया)च्या लॅम्ब्डा अल्फा इंटरनॅशनल (यूएसए) शी संलग्न सोसायटी फॉर लँड इकॉनॉमिक्स आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ही राष्ट्रीय परिषद ‘जलसंवर्धनाच्या माध्यमातून अन्न, सौरऊर्जा व पर्यावरण सुरक्षा’ ही मध्यवर्ती संकल्पनेवर होती. अध्यक्षस्थानी एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ.आर.एम.चिटणीस हे होते.याप्रसंगी ओम एल आय चॅप्टर पुणेचे अध्यक्ष, आर्कीटेक्ट आणि अर्बनप्लॅनर अनिलकुमार हाटकर, कोलंबो येथील आंतरराष्ट्रीय जल व्यवस्थापन संस्थेचे डॉ.तुषार शाह,ओम एल आयचे उपमहाप्रबंधक प्रकाश पाटील, जे. जे. कॉलेजचे प्रा. राजीव मिश्रा आणि स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड कामर्सच्या अधिष्ठाता प्रा.डॉ.अंजली साने आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. संजय चहांदे म्हणाले, ‘पाणी मानवी अस्तित्वासाठी इतके अनिवार्य आहे की आपल्या अंतराळ मोहिमांचे एक ध्येय पाण्याचा शोध ही आहे.

पृथ्वीवर पाण्याचे साठे विपुल असले तरी मानवोपयोगी जलसाठा मर्यादित आहे. उपलब्ध जलसाठे, अनियमित पाऊसमान, वाढती लोकसंख्या, औद्योगीकरणासाठी पाण्याची वाढती मागणी, अनियंत्रित भूजल उपसा या आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी जलसाठ्यांवरील नियंत्रण आवश्यक आहे. राज्य शासनाचे धोरणही या आव्हानांचा सामना करण्यासाठी पूरक करण्यात आले आहे. शाश्वत विकासाचे ध्येय या धोरणामागे आहे,‘.अनिलकुमार हटकर म्हणाले, ‘मानव कल्याण, द्रारिद्रयनिर्मूलन आणि शाश्वत विकासासाठी उद्योग क्षेत्रांमध्ये पाणी, भूजल पातळीचे संकट, ऊर्जा वापर आणि वातावरणात वाढलेली ऊर्जा व कमी झालेला हिवाळा ते टिकवून ठेवण्यासाठी त्याच्या अंमलबजावणी, सर्वोत्तम तंत्रज्ञानाच्यापद्धतीचा वापर यादृष्टीने अत्यंत महत्वाची परिषद आहे. डॉ. आर. एम. चिटणीस म्हणाले, सृष्टीवरील ७१ टक्के भाग पाण्याने व्यापलेला असून तीन टक्के पाणी पिण्यायोग्य आहे. भविष्यातील युद्ध हे पाण्यामुळे होणार आहे .त्यामुळे सर्वांनी शाश्वत विकासासाठी कार्य करावे. याचे गांभीर्य लक्षात ठेवून यूजीसी ने सर्व विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण विषय सक्तीचा केला आहे. देशातील पाच सर्वोच्च अधिकारी या कमिटीमध्ये आहे .तसेच पर्यावरण सुरक्षेसाठी संपूर्ण जनतेचा सहभाग अत्यंत आवश्यक आहे.परिषदेच्या सुरवातीच्या सत्रात उद्योग क्षेत्रांमध्ये पाणी, भूजल पातळीचे संकट, ऊर्जा वापर, अन्न आणि ऊर्जा यांच्यातील परस्परावलंबन तसेच जागतिक पुनरावलोकन, या विषयावर तज्ञांनी मते मांडली. यानंतर आयोजित विविध सत्रांमध्ये डॉ. हिमांशू कुलकर्णी म्हणाले,‘भारतातील भूजलाच्या शाश्वत व पारंपरिक व्यवस्थापन पद्धतींकडे आधुनिक काळातील शेतकर्‍यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पिकांमधील वैविध्य हरवले आहे. वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. तुषार शाह म्हणाले, भूजलाच्या उपलब्धतेत भारताला ‘भूजलसम्राट’ म्हणावे लागेल. मात्र, सर्वाधिक भूजल उपलब्ध असलेल्या गंगेच्या खोर्‍यात भूजलाचा वापर मर्यादित आहे आणि मर्यादित भूजल असलेल्या दक्षिण भागांत सर्वाधिक भूजल उपसा आहे. डॉ. रवींद्र उटगीकर म्हणाले, ‘जैव अर्थकारण’ (बायो इकॉनॉमी) च्या दिशेने वाटचाल कशी करावी, उर्जची सौर, पवन, जलविद्युत, न्यूक्लिअर, थर्मल अशी अनेक स्थित्यंतरे हरित आणि शुद्ध उर्जेत कशी परिणत करता येतील आणि ग्रीन ग्रोथ कशी साध्य करावी.

शेखर गायकवाड म्हणाले, साखर कारखान्यांमुळे पाण्याचा वापर जास्त होत चालला आहे. तसेच भूजल पातळी घटत चालली आहे. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.साखर उद्योगापासून बनणार्‍या इथेनॉलचा वापर वाढविणे आवश्यक आहे.पंकज तगल पल्लेवार म्हणाले, आजच्या काळात शेतकर्‍यांनी जास्तीत जाास्त सौरऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणात केल्यास शेतीला त्याचा लाभ मिळेल. तसेच एमएससीबी वर वाढत जाणारा ताण कमी होईल. राजेंद्र हुलानी म्हणाले, वातवरणातील बदलामुळे पावसाचे प्रमाणा कमी झाले आहे. ग्रामीण भागात पाणी टंचाई जाणवत असल्याने त्यामुळे पाण्याचे पुर्नवापर करणे आवश्यक आहे. डॉ. नितीन बस्सी म्हणाले, वातावरणातील बदलामुळे भारताला उष्णदेश बनत आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळे वातावरण दिसत आहेत. काही ठिकाणी दुष्काळ तर पुरासारखी स्थिती दिसत आहे. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण करणे गरजेचे आहे.डॉ. अंजली साने यांनी प्रास्ताविक केले. डॉ.प्रीती जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

Leave A Reply

Translate »