मतदार अमोल कोल्हेना धडा शिकवतील – शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव

मनसैनिक आढळरावांसाठी तळागाळातील मतदारांपर्यंत पोहचणार

चाकण : शिरूर लोकसभा मतदार संघात प्रचाराणे वेग घेतला आहे. या मतदारसंघात वैयक्तिक आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. खासदारकीचा मधूनच राजीनामा द्यायची घाईपण आणि निवडणूक आल्यावर ती लढविण्याची हौसपण आणि आता निवडणुकीसाठी बाळसंही आलं, असं वागून मतदारांना गृहीत धरण्याचा प्रकार डॉ. अमोल कोल्हेंकडून सुरू आहे. आता मतदार त्यांना धडा शिकवतील, असे प्रतिपादन महायुतीचे शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी चाकण येथे केले.

शिरूर लोकसभेसाठी मनसेच्या वतीने चाकणच्या आंबेठाण चौकात मेळावा झाला. या वेळी आमदार दिलीप मोहिते पाटील, मनसे नेते राजेंद्र बाबू वागस्कर, शिवसेना उपनेते इरफान सय्यद, भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, मनसे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे, जिल्हाध्यक्ष मकरंद पाटे, सरचिटणीस अजय शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष युवा मोर्चा प्रिया पवार, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, भाजपचे तालुकाध्यक्ष शांताराम भोसले, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष जयसिंग दरेकर, सभापती कैलास लिभोरे, पुणे जिल्हाध्यक्ष रामदास दरेकर, सचिन चिखले, संदीप पवार, मनोज पडवळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, मनसैनिक शिरूर लोकसभेत तन-मन-धनाने जिवाचं रान करून आढळरावांसाठी मतदान करून घेण्यासाठी लोकांमध्ये प्रचार करत आहेत. पिंपरीसाठी माजी नगरसेवक सचिन चिखले, हडपसरमध्ये साईनाथ बाबर, हवेलीची धुरा किरण माने, चेतन चौधरी, शिरूरची धुरा रवी मुरादे, नाना लांडे, किरण गव्हाणे, आंबेगावची धुरा बाबू बाणखेले, आशिष शिंदे, किरण गव्हाणे, खेडची धुरा मंगेश सावंत, सनी लोणकर, नवनाथ लोखंडे सांभाळत आहेत. विद्यार्थी सेनेचा ३०० मनसैनिकांचा मेळावा खेड तालुक्यात झाला आहे. शिरूर, हवेली, जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी या सर्वच भागातले मनसैनिक आढळरावांच्या प्रचारासाठी तळागाळातल्या मतदारांपर्यंत पोहोचत आहेत, अशी माहिती विद्यानंद मानकर यांनी दिली.

Leave A Reply

Translate »