डॉ. कोल्हे देशाच्या संरक्षण खात्याच्या गुप्ततेविषयी पोरकट भाष्य – आढळराव पाटलांचा पलटवार

मंचर : शिरूर लोकसभा मतदारसंघात सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याबरोबरच वैयक्तिक आरोप – प्रत्यारोपांना प्राधान्य दिले जात असल्याचे दिसत आहे. सरकारने आता कांद्याची निर्यातबंदी उठवली. त्यामुळे तीन महिन्यांपासून कांदा कांदा ओरड करणाऱ्या डॉ.  अमोल कोल्हेंचा हा मुद्दाच सरकारने हिरावून घेतल्याने कोल्हेंना पोटशूळ उठला आहे. त्यामुळे ते सैरभैर होऊन, देशाच्या संरक्षण खात्याच्या गुप्ततेविषयी पोरकट भाष्य करू लागले आहेत, असा पलटवार महायुतीचे शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कोल्हेंवर केला आहे.

ओतूर येथील सभेत, कंपनीच्या व्यावसायिक फायद्यासाठी आढळरावांनी संसदेत संरक्षण खात्याविषयी ७५ प्रश्न विचारल्याचा आरोप डॉ. कोल्हे यांनी केला होता. त्यावर आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हेंना चौफेर झोडपले. ते म्हणाले की, मी माझ्या कंपनीच्या व्यवसायासंबंधीचा विचारलेला एकही प्रश्न त्यांनी दाखवावा, अन्यथा जाहीर माफी मागून कोल्हेंनी निवडणूक रिंगणातून बाहेर पडावे, या शब्दांत त्यांनी कोल्हेंना ठणकावले. माझी कंपनी सॉफ्टवेअरची नसून हार्डवेअरची आहे. मुळात पाच वर्षे गायब राहून निवडणूक आल्यावर कांदा प्रश्नावर कोल्हेंनी फक्त ओरड केली, पण त्यासाठी काय केलं, सरकारकडे पाठपुरावा केला का? याचे उत्तर त्यांनी द्यावे.

Leave A Reply

Translate »