२० वर्षीय कबड्डीपटूच्या पायाच्या घोट्याचे यशस्वी प्रत्यारोपण

प्रसिद्ध ऑर्थोपेडिक आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. आशिष अरबट यांच्या यशस्वी उपचारानंतर तो पुन्हा मैदानावर उतरणार – भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारे कॅडेवर डोनरमार्फत घोट्यावर यशस्वी प्रत्यारोपण

पुणे: कबड्डीच्या सामन्यादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे घोट्याजवळील स्नायुबंध फाटलेल्या २० वर्षीय कबड्डीपट्टूवर यशस्वी उपचार करण्यात आले. पुण्यातील प्रसिद्ध ऑर्थोपेडिक आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. आशिष अरबट आणि त्यांच्या टीमने या रुग्णावर यशस्वी उपचार केले. घोट्याच्या ऊती आणि फाटलेले स्नायुबंध दुरुस्त करण्यासाठी भारतात पहिली कॅडेवरीक ॲलोग्राफ्ट प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली असून लवकरच हा खेळाडू पुन्हा एकदा मैदानावर उतरणार आहे.

या खेळाडूला पेरोनिअल टेंडन क्रॉनिटीयर(घोट्याजवळील स्नायुबंध फाटणे) गंभीर दुखापत झाली. या दुखापतीमुळे तसेच शारीरीक क्रियेदरम्यान स्नायुंच्या अतिवापरामुळे आलेल्या ताणामुळे डाव्या घोट्यासंबंधीत तीव्र वेदना जाणवू लागल्या मात्र रुग्णाने विलंब न करता पुण्यातील प्रसिद्ध ऑर्थोपेडिक आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. आशिष अरबट यांच्याकडे धाव घेतली.अशावेळी प्रसंगावधान राखत डॉ. अरबट यांनी रुग्णावर कॅडेवर डोनरमार्फत घोट्यावर यशस्वी प्रत्यारोपणाचा निर्णय घेतला व प्रत्यारोपणामुळे हा रुग्ण आता लवकरच मैदानावर उतरणार आहे.

तीन महिन्यांपूर्वी रुग्ण आर्यन सिन्हा (नाव बदलले आहे)* याला खेळादरम्यान दुखापत झाली होती आणि सलग तीन आठवड्यांच्या विश्रांतीनंतरही त्याच्या डाव्या घोट्याला प्रचंड वेदना जाणवत होत्या. त्याला दैनंदिन कामांमध्येही अडचणींचा सामना करावा लागला आणि शारीरीक हलचालींकरिता कुटुंबातील सदस्यांच्या मदतीची आवश्यकता भासू लागली. त्याला घोट्यासंबंधीत सततच्या वेदना आणि अस्वस्थतेमुळे पुन्हा मैदानावर खेळण्यासाठी जाणे अशक्य झाले. त्यानंतर त्याने डॉ अरबट यांच्याशी संपर्क साधून पुढील उरचार करण्याचे ठरविले. रुग्णाला पुन्हा स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी डॉ अरबट यांनी सर्वस्व पणाला लावले व त्याचे खेळातील करिअर इतक्यात संपणार नाही अशी खात्री देत त्याचा आत्मविश्वास वाढवित प्रत्येक टप्प्यावर त्याला प्रोत्साहन दिले. भारतातील पहिले कॅडेव्हरिक ॲलोग्राफ्ट करून या रुग्णाच्या खेळातील करिअरला नव्याने सुरुवात केली असून हा रुग्ण आता पूर्णपणे बरो झाला असून काही महिन्यातच खेळाच्या मैदानावर पहायला मिळेल.

पुण्यातील प्रसिद्ध ऑर्थोपेडिक आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. आशिष अरबट सांगतात की, तपासणी केल्यावर, रुग्णाला झालेल्या दुखापतीमुळे अस्वस्थता, हालचालींवर मर्यादा आणि चालताना त्रास होत असल्याचे दिसून आले. एमआरआय स्कॅनने डाव्या पायाच्या खालच्या पेरोनियस ब्रॅव्हिस स्नायूमधील स्नायुबंध पूर्णतः फाटल्याची आढळले. स्नायूमध्ये झीज झाली होती ज्यासाठी शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. या रूग्णाच्या तीन पैकी दोन स्नायुबंधाचे गंभीर नुकसान झाले होते त्यामुळे शस्त्रक्रिया आव्हानात्मक होती. पेरोनियल टेंडन्समधील स्नायुबंध फाटल्याने शस्त्रक्रिया जोखमीची होती.

ॲलोग्राफ्ट हा एकमेव पर्याय होता ज्यात मऊ ऊतक आणि दुखापत झालेले आणि फाटलेले स्नायुबंध हे कॅडेवर डोनरच्या टिश्यूचा वापर करून त्याची पुनर्रचना करता येईल. या शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाला पोटाच्या बाजूला ठेवले जाते. या प्रक्रियेमध्ये खराब झालेले पेरोनियल टेंडन्स दुरुस्त करण्यासाठी ॲलोग्राफ्ट टिश्यूचे प्रत्यारोपण करण्यात आले. या रुग्णासाठी टिश्यू बँकच्या
माध्यमातून ॲलोग्राफ्ट प्राप्त करण्यात आले. रुग्णाच्या आकार व संरचनेनुसाप त्याची काळजीपूर्वक निवड करण्यात आली. त्यानंतर निर्जंतुकीकरण प्रक्रियेद्वारे त्याचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. आणि प्रत्यारोपणासाठी योग्य असल्याची खात्री करुन मगच पुढील पाऊल उचलल्याचे डॉ अरबट यांनी स्पष्ट केले.

डॉ अरबट पुढे सांगतात की, डिब्रीडमेंट ही एक महत्त्वाची पायरी आहे जी ग्राफ्ट इंटिग्रेशनसाठी स्वच्छ आणि निरोगी वातावरणाची खात्री देते. ॲलोग्राफ्ट हे स्नायुबंध जोडण्याचे काम करते. ही शस्त्रक्रिया 30 मिनिटे चालली आणि रुग्णाला अवघ्या दोन दिवसांनी घरी सोडण्यात आले.

शस्त्रक्रियेनंतर, रुग्णाचा घोटा स्थिर करण्यासाठी आणि बरे होण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात कास्ट किंवा ब्रेसचा वापर करण्यात आले.रुग्णाला फिजीओथेरेपी देण्यात आली. दिवसेंदिवस रुग्णाच्या प्रगतीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी आणि भविष्यातील कोणतीही गुंतागुंत टाळण्यासाठी दर आठवड्याला नियमित फॉलोअप आणि सोनोग्राफी केली जात आहे. सध्या रुग्ण चालू लागला आहे आणि कमी तीव्रतेच्या व्यायामाने त्याने जिमिंग सुरू केले आहे असेही डॉ अरबट यांनी स्पष्ट केले.

पेरोनियल टेंडन ॲलोग्राफ्टचा विचार करणाऱ्या किंवा उपचार घेत असलेल्या रूग्णांनी शस्त्रक्रियेतील गुंतागुंत समजून घेण्यासाठी त्यांच्या तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. खेळातील गंभीर दुखापतींमुळे तुमचे करिअर संपुष्टात येईल की काय ही भिती मनातून काढून टाका आणि हे आता केवळ हात, पायांसारखे अवयवच नाही तर दात्याच्या ऊतींचा प्रत्यारोपणही शक्य आहे असे डॉ अरबट यांनी स्पष्ट केले.

खेळादरम्यान माझ्या घोट्याच्या दुखापतीवर यशस्वी ऊती प्रत्यारोपण करणारी मी पहिली व्यक्ती असेन असे मला वाटले नव्हते. मला गेल्या 3 महिन्यांपासून अतिशय वेदना होत सहन कराव्या लागत होत्या आणि शारीरीक हलचालींकरिता देखील इतरांवर अवलंबून रहावे लागत होते. मात्र मी आत्मविश्वासाने पुढे जाण्याचे ठरविले आण् मला डॉ. अरबट आणि त्यांच्या टीमकडून खुप प्रोत्साहन मिळाले. मी आता पूर्णपणे बरा झालो आहे आणि माझ्या संघात परतण्यासाठी आणि नव्याने खेळायला सुरुवात करण्यासाठी उत्सुक असल्याचे रुग्ण सागर जगताप सांगितले.

Leave A Reply

Translate »