राहुल गांधी यांच्या सभेने पुण्यात काहीही फरक पडणार नाही – मुरलीधर मोहोळ

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाल्यानंतर उद्या महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासाठी राहुल गांधी यांची सभा होत आहेत. मुरलीधर मोहोळ यांनी मोदींच्या सभेतून पुण्यात जोरदार शक्तीप्रदर्शन केले. त्यानंतर आता राहुल गांधी पुण्यात येत आहेत. यावर राहुल गांधी यांच्या येण्याने पुण्यात काहीही फरक पडणार नाही. अशी खोचक प्रतिक्रिया मुरलीधर मोहोळ यांनी दिलीय.

मुरलीधर मोहोळ म्हणाले की, राहुल गांधी यांच्या येण्याने पुण्यात काहीही फरक पडणार नाही. नरेंद्र मोदी यांची जी रेसकोर्सवर सभा झाली आणि राहुल गांधींची ज्या मैदानावर सभा होत आहे. त्या सभेच्या मैदानात जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे पुणेकर सुज्ञ आहे. राहुल गांधी आले काय अन् गेले काय त्याचा काहीही फरक पडणार नाही. अशी प्रतिक्रिया मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

प्रत्येक वेळी भाजपकडून सांगितलं जातं की ही लढाई मोदी विरूद्ध राहुल गांधी यांच्यासोबत आहे. त्यावर बोलतांना मुरलीधर मोहोळ म्हणाले की, ही देशाची निवडणुक आहे. त्यामुळे पुणेकरांना माहिती आहे की कुणाला मतदान करायचं आहे ? यामध्ये राहुल गांधी की नरेंद्र मोदी कुणाला पंतप्रधान करायचं असं पुणेकरांना विचारलं तर ते मोदींचं नाव घेतात. देशात नरेंद्र मोदी यांनी केलेलं दहा वर्षातील काम आणि राज्यात महायुतीचं सुरू असलेलं काम हे सर्व जनता पाहत आहे. त्यामुळे कुठलीही जनता ही प्रगतीला, विकासाला मत देतात. त्यामुळे पुण्यात आमचा विजय पक्का आहे. असेही मोहोळ म्हणाले.

दरम्यान, पुण्यात उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे कोणतीही सहानुभूती राहणार नाही. उलट त्यांनी जनमताचा अनादार केला. 2019 साली राज्यातील जनतेनं भाजप आणि शिवसेना युतीला दिला होता. त्यानंतर ठाकरेंनी जनतेचा विश्वासघात केला ते राष्ट्रवादी अन् कॉंग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले असा टोलाही त्यांनी ठाकरेंना लगावला.

Leave A Reply

Translate »