फ्रेमबॉक्स इन्स्टिट्यूटची नवीन शाखा ढोले-पाटील रोड येथे सुरु

पुणे – जागतिक माध्यम आणि मनोरंजन शिक्षणाच्या सर्वात प्रतिष्ठित नावांपैकी एक असेलेली फ्रेमबॉक्स संस्थेची आखणीन एक नवीन शाखा आता पुण्यातील ढोले-पाटील रोड येथील सोहरब हॉल येथे नुकतीच सुरु करण्यात आली. हि पुण्याची 5वी शाखा शाखा आहे. याठिकाणी स्पेशलायझेशन कोर्सेस B.Sc. ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, ग्राफिक आणि वेब डिझायनिंग आणि फोटोग्राफीची पदवी येथे शिकविली जाईल. फ्रेमबॉक्स 2.0 चे व्यवस्थापकीय संचालक राजेश तुराखिया यांच्या शुभहस्ते या शाखेचे उद्घाटन झाले. यावेळी फ्रेमबॉक्सच्या उपाध्यक्षा विनिता बचानी, गगनदीप सिंग ओबेरॉय, गुरबीर सिंग ओबेरॉय आणि गगनदीप सिंग यावेळी उपस्थित होते.

फ्रेमबॉक्सच्या संपूर्ण भारतात 32 शाखा आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था स्टुडिओच्या माध्यमातून कलात्मक आणि दर्जेदार प्रोग्रामिंगचा, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर याठिकाणी करण्यात येतो. थेट प्रकल्पांवर काम करण्यासाठी अनुभवी प्रशिक्षकांद्वारे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येते.

भारतातील आघाडीच्या ॲनिमेशन आणि VFX स्टुडिओमध्ये विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी फ्रेमबॉक्सने सर्वात पारदर्शक प्लेसमेंट पोर्टल तयार केले आहे. संस्थेचे विद्यार्थी सध्या डीएनईजी, टेक्निकलर, प्राइम फोकस, Framestore, Pixel Digital Studio, Rockstar, Red Chili VFX, Weta Digital, Ascension, DreamWorks, Legend, Makuta Visual Effects, MPC, Viacom 18, Golden Robot, NY VFX, इ. यांसारख्या कंपन्यांमध्ये काम करत आहेत.

फ्रेमबॉक्सचे संचालक आणि संस्थापक राजेश आर. तुराखिया म्हणाले की “कलाकार सॉफ्टवेअर वापरण्यास कसे शिकतो यापेक्षा कलाकार सॉफ्टवेअरकडे कसे पाहतो हे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्याला उद्योग-सज्ज कलाकार बनवण्यासाठी सर्वोत्कृष्ट ज्ञान देण्यासाठी आम्ही हा कलात्मक दृष्टिकोन आमच्या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये मिसळतो. आम्ही ‘टेक्निकल आर्टिस्ट ट्रेनिंग’ पद्धतीचा अवलंब करतो जिथे आम्ही नवशिक्यांना सॉफ्टवेअरचे तांत्रिक ज्ञान आणि कलात्मक समजाचे सौंदर्यविषयक ज्ञान देऊन प्रशिक्षण देतो. शिवाय, हे शिकण्याचे तंत्र आणि सर्जनशीलतेवर देखील लक्ष केंद्रित करते. भारतीय ॲनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट्स प्रशिक्षण उद्योगात अग्रेसर असल्याने,भारताच्या वेगाने वाढणाऱ्या ॲनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट्स उद्योगाच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी उद्योग-मानक प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यासाठी आमची नियुक्ती करण्यात आली आहे.” आम्ही 70 टक्के व्यावहारिक आणि 30 टक्के कौशल्य शिक्षणावर भर दिला.आम्ही आमचा अभ्यासक्रम केवळ पारंपारिक शिकवण्याच्या पद्धतींवर नव्हे तर व्यावसायिक आणि उद्योगांना आवश्यक असलेल्या कौशल्यांवर लक्ष केंद्रित करून विकसित केला आहे”, त्यामुळेच विद्यार्थ्यांना यशाची खात्री आहे.

Leave A Reply

Translate »