भाषा तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानासाठी “फिडेल सॉफ्टेक” चा गौरव

“यंग आंत्रप्रेन्युअर 2024” पुरस्काराने प्राची कुलकर्णी सन्मानित

पुणे – “भाषा तंत्रज्ञानातील गुणवत्तापूर्ण योगदानासाठी” पुण्यातील “फिडेल सॉफ्टेक” या कंपनीला डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर (DCCIA)च्या वतीने दिल्या जाणार्‍या “यंग आंत्रप्रेन्युअर्स” पुरस्काराने गौरविण्यात आले. संस्थेच्या वतीने नुकतेच यंग आंत्रप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्ह आणि रेकग्निशन 2024 या कार्यक्रमाचे आयोजन केले होते होते. शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते व पद्मविभूषण  डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या उपस्थितीत हा प्रतिष्ठित पुरस्कार देण्यात आला. फिडेलच्या वतीने व्यवस्थापकीय संचालिका प्राची कुलकर्णी यांनी या पुरस्काराचा स्वीकार केला.

यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी डॉ. पराग काळकर, अंजनी माशेलकर फाऊंडेशनचे विश्वस्त सुशील बोर्डे उपस्थित होते. बेलरिस इंडस्ट्रीज लि.चे व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत बडवे तसेच महिला उद्योजक आणि स्टार्टअप्स आणि इनोव्हेशन कमिटीच्या अध्यक्षा सुप्रिया बडवे, डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज आणि अॅग्रिकल्चरचे संस्थापक संचालक हरी पी. श्रीवास्तव यांच्या पुढाकाराने ही परिषद यशस्वीपणे पार पडली.

जगभरातील स्थानिक भाषांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान, लास्ट-माईल-डिलिव्हरी (UI/UX) तसेच संबंधित अन्य सेवा पुरविण्यात फिडेल सॉफ्टेक या कंपनीने आपली ओळख जगामध्ये निर्माण केली आहे. फिडेल ही भारतातील प्रिमियम NSE सूचीबद्ध लँगटेक कन्सल्टिंग फर्म आहे.

प्राची कुलकर्णी म्हणल्या की, या कार्यक्षेत्रामध्ये 20 वर्षांपेक्षा अधिक अनुभव असल्याने कंपनीचे ध्येय पुढे नेण्यासाठी धोरणे विकसित करण्याच्या दृष्टीने आणि लीडर्सना अधिक कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने आम्ही अचूक मार्गदर्शन करत असतो. एक अनुभवी टेक्नोक्रॅट म्हणून माला व्यवसाय वृद्धीच्या संधी ओळखण्याची तसेच क्लायंट बरोबर यशस्वी हितसंबंध जोपासण्याची स्वाभाविक क्षमता मिळाली. याच उपयोग आमच्या कंपनीचे ग्राहक जागतिक पातळीवरील (Glocal/स्थानिक) स्वतःची ओळख निर्माण करण्यात यशस्वी होत आहेत. या पुरस्काराच्या निमित्ताने मिळालेली नवी ओळख, फिडेलचे आगामी व्यावसायिक उपक्रम आणि गुणवत्तापूर्ण कार्याची वचनबद्धता अधोरेखित करून आम्हाला भाषा तंत्रज्ञान क्षेत्रामधील शक्यतांचा सत्यात्याने शोध घेण्यास प्रोत्साहन देत राहील.

Leave A Reply

Translate »