‘ताज इव्हेंट्स आणि प्रॉडक्शन’ आयोजित ‘MISS. MRS. MAHARASHTRA 2023 – SEASON 5’ दिमाखात पार पडला; यंदाच्या ५ व्या वर्षीचे हे आहेत विजेते!

परेश वैद्य यांच्या ‘ताज इव्हेंट्स आणि प्रॉडक्शन’ने आयोजित केलेल्या ५ व्या वर्षीच्या ‘MISS. MRS. MAHARASHTRA 2023 – SEASON 5’ला संपूर्ण महाराष्ट्रातून मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

आत्मविश्वासाने पुढे जाण्यासाठी, स्वत:चं नशिब घडवण्यासाठी आणि अंगी असलेलं टॅलेंट जगासमोर आणण्यासाठी प्रत्येकाला एका संधीची गरज असते, मिळालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी प्रत्येकजण मनापासून मेहनत घेत असतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘ताज इव्हेंट्स आणि प्रॉडक्शन’ चे संचालक परेश वैद्य यांनी आयोजित केलेली ‘MISS. MRS. MAHARASHTRA 2023 – SEASON 5’ हे ब्युटी पेजंट. नुकताच या ब्युटी पेंजंटचा ग्रँड फिनाले पुण्यातील कंट्री क्लब येथे पार पडला.

परेश वैद्य यांच्या ‘ताज इव्हेंट्स आणि प्रॉडक्शन’ यांनी २०१८ पासून या ब्युटी पेजंटची सुरुवात केली आणि यंदाचं वर्ष हे पाचवं वर्ष होतं. ‘MISS And Mrs. Maharashtra’ आणि ‘Miss And Mrs. India’ असे हे दोन शो ते दरवर्षी आयोजित करत असतात. पुढील वर्षीचा ‘Miss And Mrs. India 2024’ हा शो येणार असून या शोसोठी ऑनलाईन ऑडिशन देखील आतापासून सुरु झाली आहे.

‘MISS. MRS. MAHARASHTRA 2023 – SEASON 5’ हे तीन दिवसांचे होते. दरवर्षीप्रमाणे, या वर्षी देखील या सौंदर्य स्पर्धेला महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संपूर्ण महाराष्ट्रातील शहरांतून ऑडिशन घेण्यात आले होते आणि ४५ पेक्षा जास्त स्पर्धकांची ग्रँड फिनालेसाठी निवड करण्यात आली होती. तीन दिवसांच्या या ब्युटी पेजंटमध्ये स्पर्धकांना ग्रुमिंगचे ट्रेनिंग देण्यात आले, त्यांचा ऑन स्टेज आत्मविश्वास वाढवण्यात आला.

‘MISS. MRS. MAHARASHTRA 2023 – SEASON 5’ चे ‘मिस कॅटेगरी’, ‘मिसेस प्लॅटिनम’ आणि ‘मिसेस गोल्ड’ असे तीन वर्गीकरण करण्यात आले होते. ‘मिस कॅटेगरी’मध्ये डॉ. क्षितिजा मंगलसिंग पावरा (मिस महाराष्ट्र – विजेती), महेक अली खान (प्रथम उपविजेती), सायमा शेख (दुसरी उपविजेती) आणि चारवी ठाकूर (तिसरी उपविजेती) असे विजेते ठरले. ‘मिसेस प्लॅटिनम’मध्ये सौ. मृण्मयी गजानन राणे (विजेत्या), सौ.हेमांगी चेतन गरुड (पहिली उपविजेती), सौ. रोहिणी गाडगीळ (दुसरी उपविजेती), सौ. मनीषा पांचाळ (तिसरी उपविजेती), ‘मिसेस गोल्ड’मध्ये सौ. प्राची पाटील (विजेत्या), सौ. शरयु अमोल टरघळे (गोल्ड -प्रथम उपविजेती), श्रीमती ज्योत्स्ना शंकर लगस (दुसरी उपविजेती), सौ. मनाली हेडाऊ (तिसरी उपविजेती) या विजेत्यांनी या स्पर्धेचे टायटल जिंकले आहे.

‘स्कूल ऑफ एलिगंस’च्या फाऊंडर पिया रॉय, अभिनेत्री धनश्री भालेकर, डॉ. अमित कारखानिस, अभिनेते चेतन चावडा ही मान्यवर मंडळींनी ग्रँड फिनालेसाठी ज्युरीची जबाबदारी पार पाडली. स्पर्धकांचे ग्रुमिंग सेशन पिया रॉय यांच्या ‘स्कूल ऑफ एलिगंस’ यांनी घेतले. कोरिओग्राफी प्रशांत जाधव यांनी केली होती. संपूर्ण शो चे निवेदन सिमरन पाटेकर यांनी केले आणि प्रशांत पवार हे शो चे फोटोग्राफी पार्टनर होते.

गेली सलग ५ वर्षे गाजवल्या नंतर ‘ताज इव्हेंट्स आणि प्रॉडक्शन’ येत्या नवीन वर्षासाठी देखील अतिशय उत्साहाने सज्ज झालेले आहेत.

Leave A Reply

Translate »