राज्यातील सर्वात मोठे सौर ऊर्जा उपकरण प्रदर्शनाचे आयोजन…

पुणे – सौर उर्जेवर चालणारे सोलर वॉटर हिटर, सोलर ड्रायर, सोलर रेफ्रिजरेटर, सोलर कुलर जनरेटर, इन्व्हर्टर याबरोबरच विविध उपकरणे पुणेकरांना पहायला आणि खरेदी करायला मिळणार आहेत. महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (मास्मा) च्या वतीने “सोलर एक्स्पो २०२४” हे नागरिकांसाठी विनामूल्य आयोजित केले आहे. तीन दिवसीय प्रदर्शन हे शुक्रवार, शनिवार आणि रविवार (३१ मे, १ आणि २ जून रोजी) न्यू ऍग्रीकल्चर ग्राउंड येथे असणार आहे. तब्बल १०० हून अधिक सौर उर्जा उपकरण उत्पादकांची उत्पादने याठिकाणी प्रदर्शनात विक्रीसाठी आहेत. यामध्ये छोट्यात छोट्या वस्तू पासून ते मोठ्या उद्योजकांना लागणारी उपकरणे आहेत. या प्रदर्शनामध्ये सौर उर्जा क्षेत्रातील नविन तंत्रज्ञान तसेच सबसिडीविषयी विविध मान्यवरांचे मार्गदर्शनदेखील यावेळी होणार आहे. करत आहोत. या विनामूल्य सौर उपकरण प्रदर्शनाचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन मास्मातर्फे करण्यात आले.सर्वसामान्य ग्राहक ते लघु मध्यम उद्योजक यांना विविध उपकरणे खरेदी करण्यासाठी या प्रदर्शनाचा फायदा होणार असल्याची माहिती मास्माचे अध्यक्ष शशिकांत वाकडे व संयोजक प्रदीप कुलकर्णी यांनी दिली.

Leave A Reply

Translate »