योग निद्रा शिबीर पुण्यात संपन्न

पुणे: योगनिद्रा ही एक ध्यान साधना असून याचा प्रचार प्रसार करण्यासाठी कोथरूड येथील ऋषी चैतन्य योगा अँड मेडिटेशन सेंटरच्या वतीने योग निद्रा शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. आगरकर रोडवरील दादासाहेब दरोडे हॉल येथे योगनिद्रा विशेष सत्र पार पडले. यावेळी १७० हून अधिक नागरिकांनी योगनिद्रा शिबिरात सहभाग घेतला होता. परमपूज्य आनंदमूर्ति गुरुमाँ भक्तपरिवारातर्फे भारतातील ४० शहरामध्ये एकाचवेळी योग निद्रा शिबीर पार पडले. हजारो लोकांनी या शिबिरामध्ये सहभाग घेतला होता.

आजच्या स्पर्धेच्या युगात ताण-तणावग्रस्त होणे स्वाभाविक आहे. याचे दुष्परिणाम शरीरावर होतात. त्यामुळे योग निद्रा हा तणाव, निद्रानाश, नैराश्य तसेच मधुमेह आणि लठ्ठपणा यांसारख्या आजारांवर प्रभावी उपचार आहे. योग निद्रा इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (ICMR) शास्त्रज्ञांनी प्रमाणित केले आहे. योग निद्रा औषधांशिवाय उच्च रक्तदाब आणि मानसिक आजार बरे करण्यास मदत करते. आनंदी जीवन जगण्यासाठी तणावापासुन मुक्ती हाच एकमेव उपाय असून यासाठी कोथरूड येथील ऋषी चैतन्य योगा अँड मेडिटेशन सेंटर येथे दर रविवारी सकाळी ७:३० वा. ध्यान धारणा आणि इतर कार्यक्रम होत असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.

Leave A Reply

Translate »