वारीसाठी उपयोगी साहित्याचे वाटप आणि संत पूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन; चंद्रकांतदादांच्या उपस्थितीत होणार सोहळा

पुणे – वारकरी संप्रदायाची एक महत्वाची परंपरा म्हणजे वारीची परंपरा. येत्या काही दिवसातच आषाढी वारीला सुरुवात होणार असून कोथरूड परिसरातून देखील मोठ्या प्रमाणावर दिंड्या पंढरपूरसाठी रवाना होणार आहेत.तत्पूर्वी कोथरूड परिसरातील दिंड्यांना आणि भजनी मंडळांना पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली वारीसाठी उपयोगी साहित्याचे वाटप केले जाणार आहे. यासाठी येत्या ४ जून रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संयोजक गिरीश खत्री यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेला ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे,अनंत (बाप्पू )सुतार अध्यक्ष ,सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट, साई एज्युकेशन ट्रस्टचे सागर शेडग सरशैलेश जाधव,अध्यक्ष, विठ्ठल मित्र मंडळ आदी मान्यवर उपस्थित होते. येवली बोलताना गिरीश खत्री म्हणाले, महाराष्ट्रास वारकरी संप्रदायाचा थोर वारसा आहे. जातीभेद विरहित मानवतेच्या शिकवणीचा प्रचार व प्रसार करणाऱ्या वारकरी संप्रदायात अनेक थोर संतांची परंपरा लाभली आहे.खरतर अखंड विश्वाच्या कल्याणाची प्रार्थाना करणारा वारकरी संप्रदाय हा एक आदर्श असा वारकरी संप्रदाय आहे.वारीत सहभागी होणाऱ्या या दिंड्यांना किंवा सहभागी होणाऱ्या भजनी मंडळांना छोट्या-छोट्या गोष्टींची किंवा वस्तूंची आवश्यकता भासते . वारकरी त्या गोष्टींची किंवा वस्तूंची मागणी स्वतः कधीही कुणाकडे करत नाहीत, मात्र ज्यांना या संप्रदायाबद्दल आपुलकी आहे अशा लोकांना वारकऱ्यांना-भजनी मंडळांना नेमक्या कोणत्या वस्तूंची आवश्यकता आहे यांची जाणीव असते. अशीच जाणीव पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना देखील आहे.

येत्या ४ जून रोजी चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांची सेवा हे कर्तव्य मानून “संतपुजन व वारकरी मंडळांना विशेष वारीसाठी उपयोगी साहित्य वाटप” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यावेळी संत पूजनाचा देखील एक महत्वाचा कार्यक्रम होणार असून चंद्रकांत महाराज वांजळे यांचे कीर्तन देखील होणार आहे.

वारकरी संप्रदाय हा आज एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे काम करत असून हा या संप्रदायातील विचारांचा प्रचार आणि प्रसार देखील होणे आवश्यक आहे. अनेक छोटी मोठी भजनी मंडळे, विविध संस्था हे कार्य करण्यासाठी धडपडत आहेत. भजनाच्या माध्यमातून समाज एकत्र येत आहे मात्र साहित्य उपलब्ध नसल्याने अनेक भजनी मंडळांना अडचणी येतात. हि अडचण दूर व्हावी यासाठीच चंद्रकांतदादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आपल्या परिसरातील भजनी मंडळांना टाळ,मृदंग आणि वीणा वाटप करणार आहोत. अतिशय नयनरम्य आणि भक्तिमय अशा या सोहळ्याला कोथरूड परिसरातील जवळपास सर्व भजनी मंडळे, दिंड्यांचे प्रमुख आणि मोठ्याप्रमाणावर वैष्णव उपस्थित राहणार आहेत.यावेळी चंद्रकांत महाराज वांजळे यांनी देखील आपले विचार मांडले.

Leave A Reply

Translate »