कलेशी एकरुप झाल्यानंतर कला मनाला सुंदर बनवते – पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील

योगिनी आर्ट आयोजित चिञकला प्रदर्शनाचे पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे: स्वतःचे आत्मपरिक्षण केल्यानंतर आपल्यातील सुप्त गुणांचा वेध घेत एखादी कला जोपासत त्या कलेशी एकरुप झाल्यानंतर कला मनाला सुंदर बनवते ही कलेची खरी ताकद आहे.अशी भावना पुणे शहर पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी व्यक्त केली. योगिनी आडकर, भाग्यश्री जोशी-थत्ते या महिला कलाकारांच्या बालगंधर्व कलादालनात चिञप्रदर्शन उद्घाटन समारंभी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर अॕड. मकरंद आडकर, पुणे शहराचे माजी महापौर श्रीकांत शिरोळे, योगिनी आडकर उपस्थित होत्या.

पाटील म्हणाल्या, ‘स्त्री ही घराला स्वर्ग बनवते, तसेच समाजात ही नक्कीच बदल घडून शकते. आज सर्वच क्षेत्रात स्त्रीयांनी आपलं अस्तित्व निर्माण केले आहे.  हीच खरी परिवर्तनाची नांदी आहे. पुरातन काळापासून स्री पुजनीय आहे. आध्यात्मिक क्षेत्रातदेखील अन्याय विरुद्ध पेटुन उठणारी महाकाली आपल्या सर्वांना परिचित आहे. समानतेची संस्कृती समाजात रुजवणे ही आपली जबाबदारी आहे.स्रीयांकडे अनेक कला असतात, त्या कलेला प्रोत्साहन दिले तर ती कला नक्कीच बहरली जाते. योगिनी आडकर यांनी रेखाटलेली ही कलाकृती पाहिल्यानंतर मन तृप्त झाल्याची भावना होत आहे.

निसर्गाचे अद्भूत रंग, विविध प्राणी आणि पक्षी यांच्या भावमुद्रा, मानवनिर्मित विविध वस्तू आणि वास्तू तसेच पारंपारिक चित्रकलेपासून ते मॉडर्न आर्ट सारख्या नाविन्यपूर्ण चित्रशैलीने पुणेकरांच्या मनाचा अचूक वेध घेत सर्व चित्रकलेला भरभरून दाद मिळत आहे.

Leave A Reply

Translate »