माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे नदीकाठी स्वच्छता व जनजागृती अभियानाचे आयोजन संपन्न

मुळा- मुठा नदी वाचविण्यासाठी तरुणाईचा जागर

पुणे -“माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन” हा आगळवेगळा उपक्रम वर्शिप अर्थ फाउंडेशनच्यावतीने पुण्यात नुकताच मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन पुण्यातील डेक्कन बस जिमखाना बस स्टॉप च्या मागील मुळा मुठा नदीपात्रात करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भारत सरकारच्या राष्ट्रीय मानवधिकार आयोगाचे सदस्य डॉ.ज्ञानेश्वर मुळे, महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, नदी संवर्धनचे संचालक एन अशोक बाबू पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, न्यूझीलंडचे आयर्न मॅन जेम्स फुल्हम , पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्त आशा राऊत , कर्नल एल एम साठे, स्वच्छता दूत महादेव जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन वर्शिप अर्थ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पराग मते यांच्या पुढाकाराने तसेच वर्शिप अर्थ फौंडेशनचे राज देशमुख, वर्शिप अर्थ फौंडेशनचे सीईओ तेजस गुजराथी , आम्रपाली चव्हाण,अल्ताफ पिरजादे यांनी केले. यावेळी मुळा – मुठा नदीच्या काल्पनिक चित्राचे अनावरण झाले, तसेच नदी व पाणी यावर काम करणाऱ्या मान्यवरांचे सन्मान चिन्ह देवून व जमलेल्या प्रत्येकाला प्रशस्ति पत्र देऊन गौरविण्यात देखील आले.यामध्ये जलबिरादरीचे गिरीश पाटील, जलदिंडीचे रावसाहेब निचित, उपेंद्र धोंडे, सत्या नटराजन, वीणा पाटील, ग्रीन थंबचे कर्नल सुरेश पाटील, सतीश खाडे आदींना मुळा मुठा पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच यावेळी वूई कनेक्ट या मॅक्झिनचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.या कार्यक्रमासाठी वर्शिप अर्थ फाउंडेशन, पुणे महानगर पालिका,निवडणुक आयोग महाराष्ट्र, सिरम इन्स्टिट्यूट, मुकुल माधव फाउंडेशन, फिनोलेक्स पाईप, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नेहरू युवा केंद्र आदींचे सहकार्य लाभले. यावेळी पुणे परिसरातील मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स, बीएमसीसी, एसएनडीटी, एमआयटी डब्ल्यू पी यु आधी विविध महाविद्यालय व विद्यापीठातील हजारो स्वयंसेवक या मोहिमेत सहभागी झाले होते. यावेळी पथनाट्य, गाणी, कविता वाचन, चित्र आदी विविध प्रकारच्या कलांचे विद्यार्थ्यांतर्फे सादरीकरण करण्यात आले. यावेळी तरुणाईने मुळा मोठा संवर्धनाची शपथ घेतली. यावेळेस विद्यार्थी,नागरिक, शिक्षक सामाजिक संस्था असे सुंमारे 4000 नागरिक उपस्थित होते.

Leave A Reply

Translate »