इंडिया अगेन्स्ट करप्शनचा मुरलीधर मोहोळ यांना पाठिंबा – अध्यक्ष हेमंत पाटील

पुणे : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा भाजपचे सरकार येईल. त्यांनी दाखवालेला विकासाचा मार्ग देशाची प्रगती करणारा आहे, यामुळे इंडिया अगेन्स्ट करप्शनचा जाहीर पाठिंबा देशात नरेंद्र मोदी यांना आणि पुण्यात मुरलीधर मोहोळ यांना देत आहोत अशी इंडिया अगेन्स्ट करप्शन चे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

यावेळी भारतीय जन विकास महाआघाडीचे मुख्य संयोजक राजेंद्र वनारसे उपस्थित होते. याविषयी बोलताना हेमंत पाटील म्हणाले, पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी देशाचा विकास करताना हिंदुत्वाचा नारा दिला. त्यामुळे देशातील दहशतवाद कमी व्हायला मदत झालेली आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षात देशामध्ये दहशतवाद, बॉम्बस्फोट, गोळीबार अशा घटना घडल्याचे आढळत नाही. भ्रष्टाचारा संदर्भात देखील त्यांनी ठोस पावले उचलून भ्रष्टाचार देखील आटोक्यात आणला आहे. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांना जाहीर समर्थन देत असल्याचे, हेमंत पाटील यांनी सांगितले आहे.
आगामी काळात मुरलीधर मोहोळ यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातील जवळपास 50 हजार बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी आमची अपेक्षा आहे. रोजगाराबरोबरच पुणे लोकसभा मतदारसंघातील किमान गरजा स्वच्छतागृह यांची देखील उपलब्धता करावी अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.  

राजेंद्र वनारसे यांनी देखील नरेंद्र मोदी यांच्या महायुतीला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळेल व पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होती व येणाऱ्या काळात ते भारताचा सर्वांगीण विकास करतील असा विश्वास वनारसे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Translate »