स्व.जमनादास गुप्ता यांच्या 12व्या स्मृतिदिनानिमित्त 24 ऑगस्ट 2022रोजी भजन संध्या कार्यक्रमाचे पुण्यात आयोजन

पुणे -स्व. जमनादास गीताराम गुप्ता (गर्ग) यांच्या 12 व्या स्मृतिदिनानिमित्त हा कार्यक्रम बुधवार दि. 24 ऑगस्ट 2022रोजी सायंकाळी 5 ते 6 या वेळेत भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम पुण्यातील औंध रोड येथील जमना अपार्टमेंट ,पहिला मजला येथे होणार असून कार्यक्रमासाठी गायक राम पांढरे, तबलावादक सतीश काळे, गायिका स्वरांगी काळे व सहकलाकार भजन सादर करणार आहेत.जमनादास गुप्ता एक अध्यात्मिक व सेवाभावी व्यक्तिमत्व होते व त्यांनी अनेक गरजूंना मदत केली होती. एम जे असोसिएटचे संचालक मनीराम गुप्ता हे जमनादास गुप्ता यांचे सुपुत्र असून कार्यरत आहेत. जमनादास गुप्ता यांच्या स्मृतीनिमित्त भजन संध्या कार्यक्रम दरवर्षी आयोजित करण्यात येतो. हा कार्यक्रम श्रावी मीडिया अँड फिल्म प्रॉडक्शनच्या फेसबुक पेज द्वारे लाईव्ह करण्यात येणार असून तो सर्वांसाठी मोफत असणार आहे. अशी माहिती त्यांचे सुपुत्र व एमजे असोसिएटचे संचालक व मनीराम गुप्ता यांनी दिली.

Leave A Reply

Translate »