नक्षञांची पाऊस काव्य सहल उत्साहात संपन्न

पुणे: नक्षञाचं देणं काव्यमंच,मुख्यालय,भोसरी,पुणे ३९ वतीने आयोजित केलेली”नक्षञाची पाऊस काव्यसहल”नुकतीच उत्साहात संपन्न झाली. स्वातंञ्याच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त या काव्यसहलीचे आयोजन शिवनेरी पाथ्या शिवसृष्टी,पंचलिंग प्राचीन मंदिर,पाताळेश्वर मंदिर,धबधबे,माळशेज घाट,निसर्गरम्य परिसर या ठिकाणी सर्व पुणे पिंपरी चिंचवड,परिवार सर्व साहित्यिक रसिकांनी या निसर्ग सहलीचा आनंद घेतला.यावेळी परिवार हाॅटेलचा कढीवडा,मिसळ आणि आमंञण ची मासवडीचा ही आस्वाद घेतला.

या काव्यसहलीत अनेक नक्षञांनी सहभाग घेऊन माळशेज घाटात काव्यमैफल रंगविली.निसर्ग,प्रेम,जीवन,देश,
सखी,प्रेयेसी,पाऊस इ.अनेक विषयांची कवितांची बहारदार बरसात भर पाऊसात उभे राहुन माळशेज घाटाच्या स्कायवाॅक राॅकच्या कडेला कवींनी कवितांची उधळण केली.यावेळी उपस्थित येणा-या पर्यटकांनी सुध्दा या मैफलचा आनंद लुटला.समोर उंच कडा,अंगावर बरसणा-या जलधारा जणु आनंदाने या कविंवर वर्षाव करत होते.नजरेत भरणारे धबधबे,फुललेला हिरवा निसर्ग,दरीतुन हळूवार धुके इतकी छान निसर्गाची साथ मनाला ओलेचिंब करत होती.

यावेळी सहलीत प्रमुखपाहुणे महाराष्टराज्य मुख्याध्यापक संघाचे प्रवक्ते महेंद्र गणफुले,परिवार ग्रुपचे मालक उद्योजक संदीप नाईक, शुभम नाईक,माजी स्वातंञ्य सैनिक निसर्गप्रेमी कवी रमेश खरमाळे,शिवाजी ट्रेलचे प्रमुख विनायक खोत,ज्येष्ठ कवी प्रा.सुधीर जोशी,थोर इतिहास तज्ञ डाॅ.प्रा लहू गायकवाड,प्रा.राजेंद्र सोनवणे,कलाकार कवी ज्ञानेश्वर काजळे,युवा उद्योजक सचिन फुलपगार ,कविवर्य शंकर घोरपडे,कविवर्य प्रा दिलीप गोरे इ.नी सहभाग घेऊन शुभेच्छा दिल्या.या नक्षञांच्या काव्यसहलीत दिव्या भोसले,तेजू बागडे,प्रा.विदुला जाधव,साईराजे सोनवणे,सागर काळे,अश्विनी काळे,लीना कटारिया,डाॅ.गिरीष सपकाळ,माधुरी गांधी,शंकर घोरपडे,प्रा.दिलीप गोरे,सौ.मेहमुदा शैख,सचिन फुलपगार,कविवर्य यशवंत घोडे,सौ.प्रीती सोनवणे,कविवर्य पियुष काळे,अरुणा फुलपगार इ.नी या काव्यसहलीत सहभाग घेऊन आनंद घेतला.

पहिल्या टप्यात शिवनेरी किल्ल्याच्या पाथ्याशी असलेल्या छञपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णकृती पुतळ्याजवळ येऊन महाराजांचा जयघोष केला.माजी स्वातंञ्यसैनिक रमेश खरमाळे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण केला.सर्वांनी यावेळी अभिवादन केले.गडकिल्ले प्रेमी विनायक खोत यांनी जुन्नर पर्यटनांची व स्थळांची माहिती दिली.ज्येष्ठ कवी प्रा.सुधीर जोशी यांच्या निरागम काव्यसंग्रहाचे ही प्रकाशन ही केले.सर्व उपस्थित सर्व मान्यवरांना मानाचे फेट बांधुन शिवभूमीत स्वागत केले गेले.इतिहास संशोधक डाॅ.प्रा.लहू गायकवाड यांनी येथिल निसर्गस्थळांची आणि प्राचीन मंदिरांची रचना,वैशिष्टे यांची माहिती दिली.उद्योजक संदीप नाईक यांनी नक्षञाचं देणं काव्यमंच महाराष्टाभर करत असलेल्या कार्याचे कौतुक केले.शिक्षणतज्ञ महेंद्र गणफुले यांनी आलेल्या सर्व नक्षञांचे शिवभूमीत आगमन झाल्याबद्दल मनापासुन अभिनंदन केले.भविष्यातील विविध संस्थेच्या उपक्रमांना शुभेच्छा दिल्या.

या काव्यसहलीचे आयोजन कवी वादळकार,पुणे यांनी उत्तम संयोजन केले होते.मनसोक्त या सहलीचा सर्व नक्षञांनी आनंद घेतला.अशा निसर्गसहलीमुळे कविंना लेखनाची प्रेरणा मिळते.कविंच्या प्रतिभेला फुलविण्यासाठी,काव्यलेखनीला धार मिळण्यासाठी काव्यमंच सदैव असे बहारदार उपक्रम राबविण्यात असते.यावेळी सहभागाबद्दल सन्मानपञ,गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.

Leave A Reply

Translate »