मेरी सहेली महिला मंडळा तर्फे दिव्यांग मुलांनी बनवलेल्या राख्यांचे प्रदर्शन

पुणे – मेरी सहेली मंडळा तर्फे यंदा ही दिव्यांग मुले आणि गृहिणी यांनी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून मंडळाच्या अध्यक्षा देवी तन्ना गेली अठरा हा उपक्रम रबवितात. यंदा मंडळाचे २१वे वर्ष असून गेली दोन वर्षे कोरोना मूळे कोणतेच उपक्रम राबवता न आल्यामुळे या वर्षी मोठ्या प्रमाणावर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे देवी तन्ना यांनी सांगितले.

या वर्षीचे प्रदर्शन बिबवेवाडी येथील लाईटहाऊस मॉल येथे दि. २० आणि २१ जुलै दरम्यान सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत आयोजित करण्यात येणार असून यामध्ये दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या राख्या, विविध आकर्षक वस्तु तसेच घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिलांनी बनवलेल्या वस्तु व पदार्थ याचा समावेश करण्यात आला आहे. महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी मेरी सहेली महिला मंडळा तर्फे विविध उपक्रम राबविले जातात. प्रदर्शनाच्या ठिकाणी विविध स्पर्धा घेण्यात येणार असून महिला उद्योजिकांना मार्गदर्शन सत्र तसेच डेकोपेज आर्ट वरील प्रात्यक्षिक दाखविले जाणार आहॆ.मुक्ता क्रिएशन्स ,श्री क्रिएशन्स, क्रिव क्रिएशन्स, ओम क्रिएशन्स, ध्रुवीन आर्ट्स,
एसके ज्वेलरी,स्नगल स्टोअर प्रीमियम नाईट वेअर, ग्लायोना अर्मोयर किड्स गार्मेट्स ,मिती कलेक्शन्स, अनीज क्रिएशन्स, रॉयल स्वर्ग, सुका मेवा, डिझायनर कपडे, डिझायनर दागिने, फॅन्सी पादत्राणे, डिझायनर पर्सेस,खास अपंग मुलांनी बनवलेल्या राख्या तसेच इतर उपयोगी वस्तु यांची उत्पादने प्रदर्शनामध्ये असणार आहेत.या प्रदर्शनाचे उद्घाटन कोथरूड विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलंदे, वानवडीच्या डीएसपी नम्रता पाटील, प्राउथा फाउंडेशनच्या अध्यक्षा मीनाक्षी भालेराव , इंटरनॅशनल वूमन नेटवर्किंग असोसिएशनच्या संस्थापिका सुचित्रा चटर्जी , के पीस टोटल मीडिया सोल्युशन्स मीडिया प्यार अँड कन्सल्टनच्या संस्थापिका करुणा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून प्रवेश विनामूल्य आहे.स्टॉल बुकिंग व इतर माहितीसाठी या 9372284222क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave A Reply

Translate »