यंदाच्या आयकॉनिक शक्ती मासिकाच्या मुखपृष्टावरझळकणार युवा उद्योजकाचा चेहरा..

मुंबई – आयकॉनिक शक्ती मासिकाच्या कव्हर फीचरसाठी प्रथमच पुरुषांचा चेहरा झळकणार आहे. युवा उद्योजक रोहन बोस हे यंदाच्या मासिकाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. भारताला प्रदुषणमुक्त करण्याच्या ध्येयाने स्थापन केलेल्या इनफ्लेकटर इंडिया प्रायवेट लिमिटेड कंपनीचे रोहन बोस हे संचालक आहेत. अंधेरी येथे १ जुलै रोजी हा दिमाखदार सोहळा पार पडणार आहे. तसेच लहान मुलांच्या मासिकाच्या कव्हरवर स्पेशल चिल्ड्रनस् ऑफ यूमार्ट असणार आहेत. सिया इव्हेंटस्, लेबल हीना बाफना हे आयोजक असून आधी श्री एनर्जीज हे प्रस्तुतकर्ता आहेत.

११:११ (इलेव्हन इलेव्हन) अॅडवर्टायझिंग्सतर्फे हे आयकॉनिक शक्ती सहामाही मासिक असून त्याचे प्रकाशन आता पुरुष आणि लहान मुलांसाठी सुद्धा होणार आहे. महिला उद्योजकांना प्रेरणा देण्यासाठी आयकॉनिक शक्ती कायमच अग्रेसर राहिले आहेत. सक्षम महिला ह्या समाजासाठी एक उत्तम उदाहरण असतात ह्या उद्देशाने आयकोनिक शक्ती काम करत असतात.

Leave A Reply

Translate »