जोतिबाचीवाडी भजनी मंडळ आयोजित फिरता नारळी अखंड हरिनाम सप्ताहाची सासवड येथे उत्साहात सांगता

पुणे:संत विचारांचा वारसा वैष्णवांची पताका समर्थपणे लिलया पेलणारे जोतिबाचीवाडी भजनी मंडळ संप्रदायीक क्षेत्रात कायमच अग्रेसर असतात.गेली चार वर्षापासून हे भजनी मंडळ फिरता नारळी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करत आहे.त्र्यंबकेश्वर,पैठण,मुक्ताईनगर येथे यशस्वी रित्या आयोजना नंतर यावर्षी सासवड येथील संत सोपानदेव महाराज यांच्या समाधी मंदिर या ठिकाणी या सप्ताहाचे आयोजन करण्यात आलं होतं.

सकाळी काकाडा भजन,विष्णु सहस्त्रनाम,मुक्ताई चरित्र पारायण,दुपारी गाथा भजन,प्रवचन,सायंकाळी हरिपाठ,किर्तन,हरिजागर अशी दैनंदिन कार्यक्रमाची रूपरेषा होती यामध्ये हभप हरिदास महाराज खुणे,हभप व्यंकटेश महाराज चव्हाण,हभप धर्मराज महाराज जगदाळे यांची किर्तने संपन्न झाली.
४ एप्रिल रोजी सुरु झालेल्या सप्ताहाची ८ एप्रिल रविवारी भक्तीमय वातावरणात टाळ आणि मृदूंंगाचा निनाद,भगव्या पताकांची दाटी जय हरिनामाचा नामघोष अशा मंगलमय वातावरणात सासवड येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सोपानदेव समाधी मंदिरास दिंडी काढून प्रदक्षणा घालण्यात आली या नंतर हभप एकनाथ महाराज वरबडे यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता झाली.यावेळी बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.

@ प्रतिक्रिया

संतांचे विचार सध्याच्या पिढीला आत्मसात करण्याची नितांत गरज आहे तरुणाईचा वारकरी संप्रदायीक कल खूप अल्प प्रमाणात आहे तरुणांच्या मनात वारकरी संप्रदायाचं प्रेम निर्माण होणार गरजेचा आहे. जीवन समृद्ध करण्याची ताकद ही संतांच्या विचारांत आहे या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये सहभागी झाल्यानंतर मनाला मनाला मिळणारा आत्मिक आनंद हा पैशांमध्ये मोजता येत नाही.

  • ऋतुजा पवार, युवती

@प्रतिक्रिया

जोतीबाचीवाडी येथील भजनी मंडळ सातत्यानं अखंड हरिनाम सप्ताह आयोजन करत असते या सप्ताहाच्या निमित्ताने वारकरी एकत्रित येत जगण्याचा आनंद संतांच्या विचारातून भजनातून घेतात वारकरी संप्रदायाची पार्श्वभूमी असलेल्या जोतिबाचीवाडी गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने भक्तीमय वातावरणात सामील होतात.

  • दामोदर सोन्ने,वारकरी

Leave A Reply

Translate »