जगातील सर्वात मोठा विश्‍वशांती घुमट आणि श्रीमद् भगवद्गीता ज्ञानभवनाचा विश्‍वार्पण सोहळा व श्रीमद् भगवद्गीता या महान ग्रंथाच्या १.२५ लाख प्रतींचे भारतातील विद्यार्थ्यांना वितरण करण्याच्या कार्याचा शुभारंभ ३ एप्रिल रोजी

पुणे,: माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे आणि एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नॉलॉजी राजबाग, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने, मानवी जीवनाचे दशर्न देणारा, अध्यात्मशास्त्राची वैज्ञानिक प्रयोगशाळा म्हणून ओळखला जाणारा आणि जगाला सुख, समाधान आणि शांतीचा महामागर् दाखविणारा, जगातील सर्वात मोठा विश्‍वशांतीचा घुमट “तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर – श्री तुकाराम विश्‍वशांती प्रार्थना सभागृह (आध्यात्मिक शास्त्राची वैज्ञानिक प्रयोगशाळा)चे विश्‍वार्पण व जगातील सर्व धर्मांचे सार विदित करणारे, वैश्‍विक भारतीय संस्कृतीचा महान संदेश देणारे एकमेवाद्वितीय व भव्य असे श्रीमद् भगवद्गीता ज्ञानभवनाचा लोकार्पण सोहळा आणि संपूर्ण मानवतेचा जीवनग्रंथ म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्रीमद् भगवद्गीता या महान ग्रंथाच्या १.२५ लाख प्रतिंचे भारतातील विद्यार्थ्यांना वितरण करण्याच्या कार्यांचा शुभारंभ रविवार, दि.३ एप्रिल २०२२ रोजी राजबाग, लोणी-काळभोर, पुणे येथे सकाळी ९.१५ वाजता होणार आहे.याच निमित्ताने तीन (३) दिवस चालणार्‍या विज्ञान, धर्म आणि तत्त्वज्ञानावर आधारित आठव्या वर्ल्ड पार्लमेंटचे (8th World Parliament of Science, Religion and Philosophy) उद्घाटन देखील करण्यात येणार आहे.  या समारंभासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. श्री. नितीन गडकरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल श्री. भगतसिंग कोश्यारी हे असतील. तसेच, जगविख्यात संगणकतज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहतील.प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा.कराड म्हणाले, महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर माऊली व तत्त्वज्ञ संत श्री तुकाराम महाराज यांच्या पावन सान्निध्याने श्री क्षेत्र आळंदी-श्री क्षेत्र देहू आणि एकूणच पुणे हा परिसर ज्ञानतीर्थक्षेत्र म्हणून ओळखला जाऊ लागला आहे, हे आपल्या सर्वांचे भाग्यच म्हणावे लागेल. विश्‍वराजबाग, पुणे ही तर भारतीय संस्कृती ज्ञान दशर्न घडविणारा परिसर आहे. इथे केवळ जागतिक दर्जाच्या शिक्षणसंस्थाच नसून, विश्‍वशांती संगीत कला अकादमी सारखी स्व. भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर यांचे अध्यक्षपद लाभलेली अद्भुत अशी संगीत अकादमी, भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकालाचे दर्शन घडविणारे राजकपूर मेमोरियल, १८ ऋषिंचे आश्रम, ज्ञानयज्ञकुंड अशा विविध वास्तूंचा समावेश आहे.तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर – श्री तुकाराम विश्‍वशांती घुमट ही एक अद्भुत अशी अध्यात्मिक शास्त्राची वैज्ञानिक प्रयोगशाळा असून, मानवी इतिहासातील श्रेष्ठ असे संत, शास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ यांच्या भव्य पुतळ्यांचा समावेश असलेली, विश्‍वशांती, सहिष्णुता आणि मानवता यांना वाहिलेली अशी जगातील सर्वोत्तम वास्तुंपैकी एक आहे.  या वास्तुच्या घुमटाचा व्यास १६० फूट व उंची २६३ फूट आहे आणि २४ स्तंभ आहेत. हा घुमट जगातील सर्वात मोठा घुमट आहे, असे प्रमाणपत्र लंडन येथील वर्ल्ड बुक ऑफ रेकार्डसतर्फे दिले आहे.१९ व्या शतकामध्ये भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांनी भाकित केले होते की, ‘ विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून जगात शांती नांदेल.’  स्वामीजी पुढे असेही म्हणाले की, ‘२१ व्या शतकामध्ये भारतमाता ही जगाचे ज्ञानाचे दालन म्हणून ओळखली जाईल आणि ‘विश्‍वगुरु’च्या रुपात संपूर्ण जगाला सुख, समाधान आणि शांतीचा मार्ग दाखवेल’. स्वामीजींचे हे भाकित प्रत्यक्षात उतरविण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर असून त्या दिशेने आमच्या संस्थेतर्फे एक पाऊल म्हणून ही वास्तु साकार झाली आहे.

भारताचे आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी काही काळापूर्वी असे विधान केले होते की, ‘माझ्याकडे श्रीमद् भगवद्गीता या ग्रंथापेक्षा मौल्यवान असे जगाला देण्यासारखे दुसरे काहीही नाही आणि जगाला देखील यापेक्षा श्रेष्ठ असे घेण्यासारखे काही नाही.’ आदरणीय पंतप्रधानांच्या या विधानाला प्रतिसाद म्हणून आमच्या संस्थेतर्फे भारतभरातील विद्यार्थ्यांना श्रीमद् भगवद्गीता या ग्रंथाच्या सुमारे १.२५ लक्ष प्रतींचे वितरण करण्याचा संकल्प करण्यात आला असून, सदरील दिवशी त्याचा शुभारंभ करण्यात येणार आहे.आठव्या वर्ल्ड पार्लमेंटचा  मंगळवार, दि. ५ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ४.३० वाजता समारोप समारंभ होणार आहे. यासाठी केरळ राज्याचे राज्यपाल मा. श्री. अरिफ मोहंमद खान हे सन्माननीय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.  या तीन दिवस चालणार्‍या आठव्या वर्ल्ड पार्लमेंटच्या उद्घाटन व समारोप समारंभाबरोबरच १० सत्रे असतील. यात खालील विषयांवर चर्चा होणार आहे.


· पहिले सत्रः मन, पदार्थ, आत्मा आणि चेतना (Mind, Matter, Spirit and Consciousness)· दुसरे सत्रः दिव्य आशीर्वाद समारंभ – जगातील सर्व धर्मग्रंथ हे खरे जीवन ग्रंथ आहेत.· तिसरे सत्रः ओम (ॐ) – E = MC2· चौथे सत्रः भारताने संपूर्ण मानवजातीसाठी दिलेली सर्वात मोठी देणगी ओम(ॐ) आणि पतंजली योग सूत्र· पाचवे सत्रः विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून जगात सुख, समाधान आणि शांती नांदेल.· सहावे सत्रः विद्यार्थी सत्र: तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर विश्‍वशांती घुमट – विश्‍वशांतीसाठी आध्यात्मिक शास्त्राची वैज्ञानिक प्रयोगशाळा.· सातवे सत्रः भारताचा वैदिक ते आधुनिक काळापर्यंतचा विज्ञानाचा प्रवास – वैश्‍विक मूल्याधिष्ठित शिक्षणाचा आधार· आठवे सत्रः २१ व्या शतकात शांतता संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘विश्‍वगुरु’ म्हणून भारत मातेची भूमिका· नववे सत्रः वैदिक विज्ञान आणि आधुनिक विज्ञान: अंतर्दृष्टी, एकत्रीकरण आणि समन्वय· दहावे सत्रः आध्यात्मिकदृष्ट्या वैज्ञानिक संशोधन व नवनिर्मितीतून शांतताप्रिय समाज निर्मितीसाठी विद्यापीठांची भूमिका महत्त्वाची.


या वर्ल्ड पार्लमेंटमध्ये इस्लाम धर्माचे गाढे अभ्यासक मौलाना डॉ. सैयद कल्बे रशिद रिज़वि, संत बाबा बलविंदर सिंह जी, डॉ. लारी आज़ाद, सुप्रसिध्द न्युरो सर्जन डॉ. दीपक रानडे, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन, प्रा. अतुल भाई कोठारी, श्रीमती नारायणी गणेश, डॉ. एच. आर. नागेंद्र, प्रा. श्रीनिवास वरखेडी, जैन आचार्य डॉ. लोकेश जी, ब्रह्माष्टी पूज्य सद्गुरु श्री श्री रितेश्‍वरजी महाराज, डॉ. बी. रामास्वामी स्वामी, महंत योगी अमरनाथ, डॉ. योगेंद्र मिश्रा, डॉ स्वामी ज्ञानवत्सल, श्री विवेक सावंत, प्रा. डॉ. प्रियांकर उपाध्याय तसेच, विद्यापीठांचे कुलगुरू, संचालक, विचारवंत, विद्वान, तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ, धर्मपंडित इ. सहभागी होऊन आपले विचार मांडणार आहेत.त्याचबरोबर, दि. ३ एप्रिल २०२२ पासून हा जगातील सर्वांत मोठा विश्‍वशांती घुमट जनतेसाठी खुला करण्यात येणार असून, दररोज संध्याकाळी तिथे या प्रांगणाचे वर्णन करणारा ध्वनिचित्राचा (लाईट अँड साऊंड शो) कार्यक्रमदेखील सुरू करण्यात येणार आहे, हे याचे एक मुख्य आकर्षण ठरेल, असे आम्हाला वाटते.अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष राहुल विश्‍वनाथ कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड,  एमआयटी डब्ल्यूपीयूचे प्र कुलगुरू प्रा. डॉ. मिलिंद पांडे व सल्लागार डॉ. संजय उपाध्ये यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Leave A Reply

Translate »